पुणे, ता. ७ : आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात शनिवारी (ता. ८) सकाळी अकरा वाजता शाहीर अमर शेख चौक ते मालधक्का चौकदरम्यान मोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारी मोर्चा संपेपर्यंत तात्पुरते बदल केल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
प्रमुख पर्यायी मार्ग :
शाहीर अमर शेख चौक : आरटीओ चौक-जहाँगीर चौकमार्गे वाहतूक जाईल.
आरटीओ चौक : वाहने सरळ जहाँगीर चौक किंवा कुंभारवेस मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
जीपीओ चौक : वाहतूक किराड चौक व नेहरू मेमोरियल चौकमार्गे वळवण्यात आली आहे.
पुणे स्टेशन चौक : वाहने अलंकार टॉकीज/अलंकार चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
नरपतगीर व बॅनर्जी चौक : १५ ऑगस्ट चौक-कमला नेहरू रुग्णालय-कुंभारवेस चौकमार्गे वाहतूक राहील.
इतर सोयी व पार्किंग :
ससून रुग्णालयातील अत्यावश्यक सेवांसाठी ‘डेडहाऊस’ शेजारील प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल, तर रुग्णवाहिकांना या आदेशातून सूट आहे. मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था आरटीओ शेजारील एसएसपीएमएस. मैदानावर केली आहे. याशिवाय मालधक्का चौक ते पुणे स्टेशन, साधू वासवानी चौक आणि जीपीओला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर नो-पार्किंग लागू राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.