Pune APMC Sakal
पुणे

Abdul Sattar : पुणे बाजार समितीतील कोट्यवधींचा घोटाळा मीच सिध्द केला

पुण्यातील गणेश कला क्रिडामंच येथे पणन मंडळाच्या वतीने मिलेट महोत्सावाच्या उध्दाटनप्रसंगी मंत्री सत्तार आले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रवीण डोके @pravindoke007

पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यवधींचा घोटाळा मी स्वत: सिध्द केला आहे. त्यामुळे याबाबतची चौकशी गुंडाळण्याचा अथवा आजी माजी संचालकांना संरक्षण देण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत संचालक मंडळावर कारवाई होणार असल्याचा पुनरुच्चार पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

पुण्यातील गणेश कला क्रिडामंच येथे पणन मंडळाच्या वतीने मिलेट महोत्सावाच्या उध्दाटनप्रसंगी मंत्री सत्तार आले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील ५ ते ६ संचालकांच्या बाबतीत मुलाणी समितीने जो निर्णय दिला होता.

त्याप्रमाणे संचालकांविरुद्ध मी निर्णय घेतला आहे. याबाबतचा पुढचा निर्णय सरकारने घेईल. मी भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण देण्याचे काम करीत नाही. जी सत्य परिस्थिती होती त्यावर आधारितच निर्णय दिला आहे.

जिल्हा उपनिबंधकांना ६० दिवसात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते़ मात्र ९० दिवस होवूनही त्यांनी निर्णय दिला नाही त्यामुळे ही चौकशी गुंडाळली असल्याची चर्चा बाजार समिती आणि पणनच्या वतुर्ळात सुरु असल्याच्या प्रश्नावर सत्तार म्हणाले, चौकशी गुंडाळली असती तर गुंडाळल्यासारखा निर्णय दिला असता. जे जे चुकीची कामे करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

संचालकांना मी संरक्षण दिले असते तर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सिध्दच झाला नसता. निर्णय देताना मलाही अनेक अडचणी आल्या मात्र सत्य बोलावे लागते सत्य करावे लागते या युक्तीप्रमाणे मी जे सत्य आहे ते केले असेही सत्तार यांनी सांगितले.

जिल्हा उपनिबंधकांवर कारवाईचा इशारा

मी जो निर्णय दिला आहे, तो तपासून घ्या असे सांगत मुलाणी समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास तसेच दिरंगाई केल्यास जिल्हा उपनिबंधकांवरही कारवाई करण्याचा इशाराच राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला़ आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक याबाबतचा निर्णय तातडीने घेणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

निर्णयाचे इतिवृत्त देण्याची सूचना

बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे या ठिकाणी आपण काही चुकीची कामे करतो का, काळे धंदे करतो का, संचालक मंडळाने घेतलेले निर्णयांची माहिती देण्यास तसेच इतिवृत्त देण्यास काय अडचण आहे. तुम्ही पारदर्शक काम करत असाल तर इतिवृत्त देण्यास का घाबरता तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का सवाल उपस्थित करत इतिवृत्त देण्याच्या सूचना सत्तार यांनी बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT