Red rose sakal
पुणे

Pune : बाजारात लाल गुलाबाची चलती; व्हॅलेंटाइन डे' निमित्त मागणी

आठवडाभरात १० लाख गुलाबाची आवक

प्रवीण डोके @pravindoke007

पुणे : 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्त मार्केट यार्डातील फूल बाजारात विविध प्रकारच्या गुलाबांना मोठी मागणी वाढली आहे. आठवडाभरात मार्केट यार्डात सुमारे १० लाख गुलाबाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत गुलाबाच्या भावात ३०-४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोमवारी घाऊक फूल बाजारात दर्जानुसार गुलाबाच्या २० नगास २०० ते ३०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती अखिल फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. किरकोळ बाजारात एक फूल २० -३० रुपयांना मिळत आहे. १४ फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे'ला एक आठवडा अगोदरपासूनच खरेदीदारांकडून मागणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

तळेगाव, मावळ, जातेगाव, शिरूर नगर याभागतून बाजारात गुलाबाची आवक होत आहे. तसेच नागपूर, सुरत, बडोदा, इंदूर, हैदराबाद, दिल्ली येथे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 'व्हॅलेंटाइन डे'मुळे अनेक शेतकऱ्यांनी माल राखून ठेवला होता. यंदा शेतकऱ्यांना फुलांना चांगला भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी असल्याचे वीर यांनी सांगितले.

सोशल मीडियाच्या जमान्यातही गुलाबाला मागणी

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे इमेज तसेच व्हिडिओद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेण्ड वाढत आहे. तरही बाजारात गुलाबाची मागणी जास्त आहे. अनेक तरुण-तरुणी सोशल मीडियावरून शुभेच्छा देण्यापेक्षा प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा देत आहेत. त्यामुळेच मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात गुलाबंना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याचे प्रसिद्धी प्रमुख सागर भोसले यांनी सांगितले.

बाजारात लाल, पांढऱ्या, पिवळ्या व इतर रंगांच्या गुलाबांना मागणी आहे. मागिल वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी जास्त आहे. पॉलिहाउसमध्ये उत्पादित होणाऱ्या गडद लाल रंगाच्या फुलांना परदेशात मागणी आहे. निर्यात संपल्यानंतर बाजारपेठेत फुलांचा पुरवठा सुरू होतो.

- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल फूल अडते असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT