Pune Market Yard sakal
पुणे

Market Yard : बाजार समितीच्या फी उत्पन्नात मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ; तब्बल एवढ्या कोटींची झाली वाढ

कृषी उत्पन्न बाजार समितीला पुणे 2023-24 या आर्थिक वर्षात बाजार फी’च्या (सेस) माध्यमातून 68 कोटी 40 लाख 42 हजार 837 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

प्रवीण डोके

मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीला पुणे 2023-24 या आर्थिक वर्षात बाजार फी’च्या (सेस) माध्यमातून 68 कोटी 40 लाख 42 हजार 837 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बाजार फी’च्या (सेस) उत्पन्नात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. समितीने बाजार फी’मध्ये वाढ होण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणून 2022-23 च्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात बाजार शुल्काच्या उत्पन्नात तब्बल 16 कोटीची वाढ झाली आहे.

बाजार समितीला सन 2022-23 या आर्थिक वर्षांत 52 कोटी 56 लाख 6 हजार 443 रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. दरवर्षी मिळालेल्या उत्पन्नाच्या 10 टक्के वाढीचे उदिष्ट ठेवले जाते. मात्र यावेळी 30 टक्के उत्पन्न वाढीचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. बाजार शुल्क उत्पन्न वाढीसाठी योग्य त्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

तसेच नियमित सेस भरण्यासाठी भरण्यासाठीही प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीला फी च्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी दिली.

फळे व भाजीपाला विभागातून 27 कोटी 34 लाख 17 हजार 573 रूपये, गुळ व भुसार विभागातून 27 कोटी 11 लाख 41 हजार 122 रूपये, मांजरी उपबाजारातून 3 कोटी 19 लाख 88 हजार 435 रूपये, तर फुलांच्या बाजारातून 2 कोटी 11 लाख 58 हजार 469 रूपयाची बाजार फी प्राप्त झाली आहे. सर्व विभागातून बाजार समितीला फी च्या माध्यमातून 68 कोटी 40 लाख 42 हजार 837 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहेत.

2022-23 या वर्षांत 52 कोटी 56 लाख 6 हजार 443 रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीला मुख्य बाजारातील गुळ-भुसार, फळे व भाजीपाला, फुलबाजार, केळी बाजार, पान बाजार तसेच उत्तमनगर, खडकी, मोशी, पिंपरी, मांजरी आदी उपबाजारासह जनावरांचा बाजार, भरारी फथक आणि बाह्य बाजार फी आदीच्या माध्यमातून फी’च्या रूपाने उत्पन्न मिळत असल्याचे धोंडकर यांनी सांगितले.

उत्पन्नात फळे-भाजीपाला विभागाची बाजी

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला मुख्य बाजार, उपबाजारासह अन्य विभागातून बाजार फी च्या माध्यमातून जे उत्पन्न मिळाले आहे. फळे आणि भाजीपाला विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे यांच्या विभागाने बाजी मारली आहे. या वर्षांत विभागातून 27 कोटी 34 लाख 17 हजार 573 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर गुळ व भुसार विभाग प्रमुख प्रशांत गोते यांच्या विभागातून 27 कोटी 11 लाख 41 हजार 122 रूपये उत्पन्न मिळाले आहे.

बाजार फी वाढविण्यासाठी विविध उपाय-योजना केल्या होत्या. नियमित सेस भरण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच बाजारात होणारी आवक आणि प्रत्यक्ष नोंद याची तपासणी केली जात आहे. गाळ्यावरील आवकेच्या नोंदीही तपासल्या जात आहेत. त्यामुळे बाजार फीच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नात वाढ झाली.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

प्रत्येक विभागाला प्रशासनाकडून फी उत्पन्न वाढविण्याचे उदिष्ट देण्यात आले होते. बाजार फी उदिष्ट पूर्ण होण्यासाठी प्रत्येक महिन्याला विभाग प्रमुखांची बैठक घेऊन सातत्याने फी वाढीसाठी उपाययोजना केल्या.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत समुद्राला उधाण, किनारपट्टी भागात उंच लाटा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

SCROLL FOR NEXT