Pune Market Yard sakal
पुणे

Pune Market Yard : कोट्यवधींचा भूखंड तुटपुंज्या भाडेतत्त्वावर देण्याचा घाट

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकीय राजवटीत डाळींब यार्डच्या नावाखाली कोट्यावधींचा भूखंड हाडपण्याचा प्रयत्न फसला होता.

प्रवीण डोके

मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकीय राजवटीत डाळींब यार्डच्या नावाखाली कोट्यावधींचा भूखंड हाडपण्याचा प्रयत्न फसला होता. प्रस्तावित अद्ययावत बाजार उभारणीसाठी ठेवलेली कोट्यवधी रुपयांची मोक्याची जागा मासळी मार्केटसाठी ठराविक तीस विक्रेत्यांना तुटपुंज्या भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मासळी मार्केटच्या नावाखाली तोच प्रकार पुन्हा सुरू झाल्याची चर्चा बाजारात सुरू आहे.

मार्केट यार्डातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील शिवनेरी रस्त्यालगत असलेल्या मोक्याच्या पार्किंगच्या जागेत मासळी बाजार होणार आहे. मासळी बाजाराला अडते, व्यापारी आणि जैन संघटनांनी विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात सोमवारी (ता.११) बाजार समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

प्रशासकीय राजवटीमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी डाळिंब यार्ड उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांच्या आर्थिक व्यवहाराची चर्चा झाल्यानंतर आणि माध्यमांनी भूखंड गिंळकृत करण्याचा हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यांनतर पणन संचालकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर हे प्रकरण थंड झाले.

मार्केट यार्डच्या आजूबाजूचे स्थानिक रहिवासी, नागरिक, अडते, व्यापारी यांचा मासळी बाजाराला विरोध असताना, संचालक मंडळाने मासळी बाजार उभारण्यावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. संचालक मंडळाच्या या निर्णयाच्या विरोधात विविध संघटनांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देखील गाऱ्हाणे मांडले आहे.

प्रशासकिय राजवट संपल्यानंतर आलेल्या संचालक मंडळाने आता बाजार समिती कायद्यातील नियमन असलेल्या चिकन, मासळीचा आधार घेत, या भूखंडावर मासळी बाजार उभारण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाला स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील विरोध केला असून, त्यांनी या निर्णयाबाबत अधिकाऱ्यांची एका संचालकासमोर कान उघडणी केल्याचे समजते. तर या एका संचालकांना देखील मासळी बाजार होऊ देऊ नका अशी तंबी दिली आहे.

बाजार समितिचे संचालक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टीने कायद्यानुसार नियमनात असलेल्या मासळीचा बाजार सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने ठराव केला आहे. त्यानुसार संबंधित जागेत मासळी बाजार सुरू केला जाणार आहे.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

पार्किंगची जागा भविष्यातील वाहनांची संख्या पाहता बाजार आवारासाठी आवश्यक आहे. तसेच बाजार आवारातील बहूसंख्य व्यावसायिक हे शाकाहारी असून अशा प्रकारे पोल्ट्री आणि फिश मार्केटला परवानगी दिल्यास आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरू शकते. त्याचा विपरीत परिणाम आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या समाज घटकांवर होणार आहे. याबाबत अनेक संघटना तसेच अनेक मा. नगरसेवक आणि आमदार यांनी कळविले आहे. तरी वरील सर्व बाबींचा विचार करता येथे पोल्ट्री आणि फिश मार्केटचा प्रस्ताव रद्द करायला हवा.

- राजेंद्र बाठीया, अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर

लोकनेते अण्णासाहेब मगर यांनी दूरदृष्टी ठेवून मोठया कष्टाने कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापन करून मार्केटयार्ड इथे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला, फळं आणि इतर कृषी मालाच्या खरेदी विक्रीला प्रोत्साहन दिले. यामध्ये मोठया प्रमाणात जैन व्यापारी बांधवांचे योगदान ही मोठे आहे. आज मासे चिकन मटण विक्रीला परवानगी देतं आहेत उद्या दारू विक्रीला सुद्धा परवानगी मिळेल अशी शंका आमच्या मनात निर्माण होतं आहे. यां सगळ्या गोष्टीला आत्ताच रोखले गेले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मार्केटयार्डात चिकन, मटण, मासे विक्रीस आमचा विरोध आहे. यां निर्णया विरोधात पुणे शहर काँग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येणारं आहे.

- अरविंद शिंदे, अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस

कृषी उत्पन्न बाजार समितीने वापराशिवाय असलेली जागा फिश आणि पोल्ट्री मार्केटला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा शेतकरी हिताचा निर्णय आहे. बाजार समितीच्या आणि ग्राहक हिताचाही निर्णय आहे. तरीही काही राजकीय नेते त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या निर्णयाला विरोध करीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मार्केट कमिटीच्या निर्णयाला पाठिंबा आहे.

- जयराज लांडगे, उपाध्यक्ष, पुणे उपशहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

बाजार समितीने शेतकरी आणि व्यापारी हिताची कामे करणे अपेक्षित आहे. मात्र, नवनिर्वाचित संचालक मंडळ आल्यापासून व्यापाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. बाजार समितीने होलसेल फिश मार्केट आणि पोल्ट्री व्यवसाय सुरू केल्यास मी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. आमचा या प्रकाराला तिव्र विरोध आहे.

- प्रविण चोरबेले, माजी अध्यक्ष, पुणे मर्चंट चेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT