मार्केट यार्ड, ता. १ : पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याइतकीच झाली होती. आवक आणि मागणी समप्रमाणात असल्याने बटाटा, घेवडा आणि तोतापुरी कैरीच्या भावात घट झाली, तर मागणी वाढल्याने काकडी व शिमला मिरचीच्या भावात वाढ झाली असून अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर होते. मार्केट यार्डात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
विविध भाजीपाल्याच्या परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशातून हिरवी मिरची सुमारे १४ ते १५ टेम्पो, कर्नाटकातून कोबी ४ ते ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून शेवगा ४ ते ५ टेम्पो, राजस्थानातून गाजर सुमारे ६ ते ७ टेम्पो, मध्य प्रदेशातून येथून मटार १४ ते १५ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरातमधून भुईमूग शेंग प्रत्येकी ३ टेम्पो, कर्नाटकातून पावटा ३ ते ४ टेम्पो, तामिळनाडूतून तोतापुरी कैरी २ ते ३ टेम्पो, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे १४ ते १५ टेम्पो, तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची ३० ते ३५ टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ७०० ते ८०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० क्रेट, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ६ ते ७ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, घेवडा ३ ते ४ टेम्पो, पावटा ३ ते ४ टेम्पो, तर कांद्याची सुमारे १०० ते १२५ टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ८०-१३०, बटाटा : ७०-१३०, लसूण : ३५०-१०००, आले सातारी : ३००-५५०, भेंडी : ३००-५००, गवार : ६००-९००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : ४००-४५०, हिरवी मिरची : ५००-७००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी :२००-२५०, काकडी : १६०-२००, कारली : हिरवी ४००-४५०, पांढरी : २५०- ३००, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : ८०-१२०, वांगी : २५०-५००, डिंगरी : ४००-४५०, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी : ४००-४५०, जाड : २००-२२०, शेवगा : ७००, गाजर : २००-२५०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : २५०-३००, कोहळा : २००-३००, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ७००-१०००, मटार : परराज्य मटार : २८० ते ३२०, पावटा : ३००-३५०, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी :७००-१०००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
मेथी, चाकवत, हरभरा गड्डी,
अंबाडीच्या भावात घट
मार्केट यार्डातील तरकारी विभागात मेथी, चाकवत आणि अंबाडी आणि हरभरा गड्डीच्या भावात वाढ झाली असून कोथींबीर, शेपू, कांदापात, करडई, पुदीना, मुळे, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, मेथीची ८० हजार जुडी, तर हरभऱ्याची सुमारे ५ ते १० हजार जुड्यांची आवक होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ८००-१२००, शेपू : ८००-१०००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ४००-७००, करडई : ५००-८००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ४००-८००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ५००-७००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-७००, पालक : १०००-१५००, हरभरा गड्डी ८००- १५००.
लिंबाच्या भावात वाढ
रमजान महिना सुरू असल्याने मार्केट यार्ड फळबाजारात सर्वच फळांना मागणी मोठी आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने कलिंगड आणि खरबुजाच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी घसरले. तर, मागणीअभावी चिकूचे दर दहा ते पंधरा टक्क्यांनी उतरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. उन्हाच्या चटक्यामुळे लिंबाला मागणी वाढली आहे. त्या तुलनेत आवक कमी पडल्याने लिंबाच्या १५ ते २० किलोच्या गोणीमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने गतआठवड्यातील दर टिकून होते.
फळबाजारात रविवारी मोसंबी ४० ते ५० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबाची सुमारे ८०० ते १ हजार २०० गोणी, कलिंगड ६० ते ७० टेम्पो, खरबूज २५ ते ३० टेम्पो, चिक्कू ३ हजार गोणी, पेरू १५० ते २०० क्रेट, अननस ६ ट्रक, स्ट्रॉबेरी ५ ते ६ टन, द्राक्षे ३० ते ३५ टन आणि बोरांची २० पोती इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१४००, मोसंबी : (३ डझन) : १६०-३२०, (४ डझन) : ७०-१४०, संत्री : (१० किलो) : ३००-१०००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : ८०-२५०, आरक्ता : १०-८०, गणेश : १०-५०, कलिंगड : १५-२०, खरबूज : १२-२०, पपई : १२-२५, चिक्कू (दहा किलो) : १००-५००, पेरू (२० किलो) : ६००-८००, अननस (१ डझन): १००-६००, बोरे (१० किलो) : चमेली २५०-३००, चेकनट : ९००-१०००, उमराण : १००-१२०, चण्यामण्या : ८००-९००. द्राक्षे : (१५ किलो) : सुपर सोनाका : १०००-१३००, सोनाका : ८००-१०००, जम्बो (१० किलो) : ८००-१३००, स्ट्रॉबेरी (२ किलो) : १००-३००.
फुलांचे भाव टिकून
मार्केट यार्ड फुल बाजारास येत्या मंगळवारी धुलिवंदनानिमित्त सुट्टी असणार आहे त्यामुळे फुलांची आवक वाढली आहे, मात्र मागणी नसल्याने गेल्या आठवड्यातील स्थिर असल्याचे व्यापार सागर भोसले यांनी सांगितले.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ८०-१८०, अॅस्टर : जुडी १०-१५, सुट्टा : ८०-१००, कापरी : २०-४०, शेवंती : ८०-१५०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : ५०-६०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०, जर्बेरा : २०-३०, कार्नेशियन : ८०-१५०, शेवंती काडी : १५०-२५०, लिलीयम (१० काड्या) : ८००- १०००, ऑर्किड : ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : ५०-१५०, लिली बंडल : ७-८, मोगरा : ६००-८००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.