suicide sakal
पुणे

Woman Suicide : पतीने मोबाईल ब्लॉक केल्यामुळे विवाहितेची आत्महत्या

प्रेमविवाहानंतरही पतीने संशय घेत मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

प्रेमविवाहानंतरही पतीने संशय घेत मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुणे - प्रेमविवाहानंतरही पतीने संशय घेत मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीक्षा माने (वय २२) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना कात्रज येथील संतोषनगरमधील घुंगरुवाले चाळीत ८ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता घडली. या संदर्भात वडील राहुल देवराव माने (वय ४८, रा. आंबेडकरनगर, यवतमाळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश कुरेवार (रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश आणि समीक्षा हे दोघे मूळचे यवतमाळ येथील आहेत. त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी घरी न सांगता प्रेमविवाह केला. ती शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. परंतु समीक्षा ही दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय घेऊन तो तिला मारहाण करीत होता. तिला सतत त्रास देऊन त्याने तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. त्यामुळे या विवाहितेने घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT