Pune may have 40000 confirmed Coronavirus cases by 15th June 
पुणे

Coronavirus : पुण्यात 'या' तारखेपर्यंत ४० हजार रुग्ण होण्याचा धोका

सकाळवृत्तसेवा

पुणे : आगामी दोन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग किती वेगाने वाढेल, याचा वेध एसईआयआर (सस्पेक्‍टीबल-एक्‍स्पोजर, इन्फेक्‍शिअस, रिमुव्हड ऑर रिकव्हर्ड) या प्रारुपाच्या आधारावर सरकारी आरोग्य यंत्रणांनी घेतला आहे. त्यानुसार १५ जूनपर्यंत पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चाळीस हजार होण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात बेस्ट केसनुसार १५ जूनपर्यंत रुग्णांची संख्या ४० हजारपर्यंत वाढेल. त्यात दोन हजार रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागणार असल्याचा अंदाज असून, सहा हजार रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवावे लागेल, असेही यात स्पष्ट केले आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिका, वैद्यकिय उपकरणे आणि तंत्रज्ञ यांची पुरेशा प्रमाणात उपलब्ध करणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पुण्यातील पेठा सील केल्या जात आहेत. तसेच, पेठातील ७२ हजार कुटुंबाचे स्थलांतर करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यामध्ये स्थलांतर करण्यात येणाऱ्या ७२ हजार कुटुंबातील ३ लाख ५० हजार लोकांचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आर-नॉट कमी करण्याचे आव्हान
साथीच्या रोगाचा उद्रेक मोजण्यासाठी आर-नॉट या पद्धत वापरतात. लॉकडाऊन नसते तर एक रुग्ण महिन्याभरात किती रुग्णांपर्यंत विषाणूंचा फैलाव करू शकतो, हे आर-नॉटवरून मोजता येते. राज्यात सध्या आर-नॉट १.८ ते २.५ दरम्यान असल्याचे या अहवालात आहे. या आधारावर राज्यात एक रूग्ण ४६५ जणांना महिनाभरात कोरोनाचा संसर्ग करू शकतो. सामाजिक अंतर आणि घरात बसून हे प्रमाण कमी केल्यास नजीकच्या भविष्यात होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण निश्‍चित कमी होईल, असा विश्‍वासही साथरोग तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, राज्यात पुढील ६८ दिवसांमध्ये म्हणजे १५ जूनपर्यंत कोरोनाचा संसर्गाचे रुग्ण चार लाख ९० हजार होतील अशी शक्यता ‘एसईआयआर’ प्रारुपाच्या आधारावर वर्तविली आहे. त्यापैकी ५ टक्के रुग्णांना उपचारांसाठी आयसीयूमध्ये दाखल करावे लागेल. त्यांची संख्या सुमारे ८० हजार असेल. आयसीयूची गरज नसणाऱ्या पण, उपचारांसाठी रुग्णालयातच भरती कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या दोन लाख ४५ हजार असेल, असेही यात नमूद केले आहे. राज्याच्या दृष्टीने दोन महिने आव्हानात्मक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT