पुणे, ता. १५ : मार्केट यार्ड परिसरात रिक्षातून मेफेड्रोन विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून मेफेड्रोन, रिक्षा, मोबाइल आणि रोकड असा सात लाख पाच हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सुभाषगौडा गुरण्णा चौधरी (वय ३२), बाप्पू भीमा भालशंकर (वय २८) आणि शाहरुख मेहबूब खान (वय २८, तिघे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवारी (ता. १४) अमली पदार्थविरोधी पथकातील कर्मचारी मार्केट यार्ड परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर तिघे जण मेफेड्रोन विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता २४ ग्रॅम ६३ मिलिग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल, रिक्षा आणि दोन हजार ८२९ रुपयांची रोकड असा मुद्देमाल मिळून आला. आरोपींवर मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन माने, सहाय्यक निरीक्षक अफरोज पठाण, अमोल जगताप, सतीश चव्हाण, शरद धोंडे आणि संदीप देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.