Pune Metro Sakal
पुणे

पुणे मेट्रोची चाल होणार ऑटोमॅटिक!

मेट्रोचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी जागतिक दर्जाची अत्याधुनिक ‘कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टम’च्या (सीबीटीसी) चाचण्यांना वनाज- गरवारे मार्गावरील मेट्रोमध्ये प्रारंभ झाला आहे.

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

मेट्रोचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी जागतिक दर्जाची अत्याधुनिक ‘कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टम’च्या (सीबीटीसी) चाचण्यांना वनाज- गरवारे मार्गावरील मेट्रोमध्ये प्रारंभ झाला आहे.

पुणे - मेट्रोचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी जागतिक दर्जाची अत्याधुनिक ‘कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टम’च्या (सीबीटीसी) चाचण्यांना वनाज- गरवारे मार्गावरील मेट्रोमध्ये प्रारंभ झाला आहे. या सिग्नलिंग प्रणालीमुळे दर दोन मिनिटाला ट्रेन सोडणे शक्य होणार आहे. तसेच या मुळे मेट्रो ट्रेन स्वयंचलित पद्धतीने धावणार आहे.

सीबीटीसी प्रणालीमध्ये रेडिओ कम्युनिकेशनद्वारा ट्रेनच्या स्थानाची, वेगाची आणि इतर महत्वाची माहिती सतत ट्रेनमधील कॉम्पुटरद्वारा व ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टमद्वारे नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहणार आहे. यामुळे दोन मेट्रो ट्रेन एकमेकांजवळ येणे अथवा त्यांची धडक होणार नाही. काही कारणास्तव एखादी ट्रेन थांबली तर तिच्या मागची ट्रेन आपोआप सुरक्षित अंतर ठेऊन उभी राहील.

प्रत्येक ट्रेनमध्ये एक उच्च दर्जाचा कॉम्पुटर असेल. तो विभागीय नियंत्रण कक्षाशी संपर्कात असेल. तसेच इतर ट्रेनमध्ये असलेल्या कॉम्पुटरशी सतत संपर्कात असेल व ट्रेनच्या स्थानाची अचूक माहिती अद्ययावत करत राहील. चाचण्यांमध्ये वनाझ व नळ स्टॉप या विभागांत एकाचवेळी सध्या तीन ट्रेन चालविण्यात येत आहेत. पुढच्या टप्प्यात चाचण्या पिंपरी चिंचवड- फुगेवाडी मेट्रो मार्गावर होतील. येत्या तीन महिन्यांत ही यंत्रणा दोन्ही मार्गांवर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होणार आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले आहे. वनाज- गरवारे मार्गावर सध्या रोज सरासरी ८ हजार प्रवासी मेट्रोचा वापर करीत आहेत.

सीबीटीसी सिग्नलिंग सिस्टमची वैशिष्ठे -

- दर दोन मिनिटांला सुरक्षितपणे ट्रेन सोडणे शक्य

- मेट्रो प्रणालीचा संपूर्ण क्षमतेने वापर, जास्तीत जास्त ट्रेन चालवणे शक्य

- प्रवाशांना ट्रेनच्या स्थानाची व ट्रेनच्या वेळेची अचूक माहिती मिळू शकेल

- ट्रेनचे संचलन स्वयंचलीत पद्धतीने होणार, चालक फक्त यंत्रणेवर देखरेख करणार

- ट्रेन चालू करणे, तिचा वेग वाढवणे आणि ती फलाटावर नियोजित जागेवर थांबवणे ही प्रक्रिया ऑटोमॅटिक होणार

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ‘सीबीटीसीच्या चाचण्या हा पुणे मेट्रोच्या पूर्णत्वाकडे जाणारा एक महत्वाचा टप्पा आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही सिस्टीम महत्त्वाची आहे. अल्पावधीतच पुणे मेट्रो फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय व गरवारे ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान धावेल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT