pune metro Sakal
पुणे

मेट्रोने २२ हजार जणांचा प्रवास; एका दिवसात कमावले....

पहिल्याच दिवशी दोन्ही मार्गावर २२ हजार ४३७ पुणेकरांनी मेट्रोच्या सफरीचा आनंद लुटला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन्ही मार्गावर २२ हजार ४३७ पुणेकरांनी मेट्रोच्या सफरीचा आनंद लुटला. यातून महामेट्रोला दिवशी ५ लाख ५३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

महामेट्रोने वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि फुगेवाडी ते पिंपरीचिंचवड हे १२ किलोमीटरचे मेट्रो मार्ग प्राधान्याने तयार केले. त्याचे उद्घाटन आज मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी तीन ते रात्री नऊ या सहा तासासाठी नागरिकांना मेट्रो प्रवासासाठी खुली झाली. त्यामुळे दुपारपासून सर्वच स्टेशनवर नागरिकांची गर्दी होती. मेट्रोच्या जवळपास सर्वच फेऱ्या हाऊसफूल झाल्या आहेत.

रात्री नऊ वाजता मेट्रोची शेवटची फेरी झाली, वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर १५ हजार ८४२ नागरिकांनी प्रवास केला. तर फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर ६ हजार ९९५ नागरिकांनी प्रवास केला. यातून महामेट्रोला ५ लाख ५३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

महामेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक हेमंत सोनवणे म्हणाले, पहिल्या दिवळी मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात दोन्ही मार्गांवरून २२ हजार ४३७ जणांनी प्रवास केला आहे, तर दोन्ही मार्गावर प्रत्येकी १२ फेर्या झाल्या असून, त्यातून ५.५३ लाखाचे उत्पन्न मिळाले. उद्यापासून सकाळी ८ वाजता मेट्रो सेवा सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT