‘पुणेरी मेट्रो’ची वाटचाल : मंजुरी ते उद्घाटन
- २०१७ : केंद्र सरकारच्या ‘नवीन मेट्रो रेल धोरण २०१७’ अंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय
- २०१८ : राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
- ऑक्टोबर २०१८ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत टाटा व सिमेन्ससह २३.३ किलोमीटर प्रकल्पाचे कंत्राट मंजूर. यासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड ही विशेष कंपनी स्थापन.
- डिसेंबर २०१८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात भूमिपूजन
- सप्टेंबर २०१९ : ‘पीएमआरडीए’ आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या
२०२०-२०२१ : कोरोना काळात हिंजवडी व शिवाजीनगर भागातील भूसंपादन (तसेच सरकारी जागा हस्तांतरण) अडचणींमुळे कामाची गती काहीशी मंदावली
- नोव्हेंबर २०२१ : केंद्र सरकारच्या सशक्त समितीच्या ८ नोव्हेंबर २०२१ च्या बैठकीत प्रकल्पाला कमाल २० टक्के आर्थिक सहाय्य देण्यासाठी अंतिम मान्यता देण्याची शिफारस. प्रकल्पासाठी आवश्यक ९० टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन आणि तांत्रिक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू. सुरुवातीला ४० महिन्यांची (मार्च २०२५ पर्यंत) मुदत निश्चित
- नोव्हेंबर २०२२ : त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी
- फेब्रुवारी २०२५ : बांधकामादरम्यान आलेल्या विविध तांत्रिक अडचणी आणि वाहतूक बदलांमुळे मेट्रो सवलतधारकाने ५४३ दिवसांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर
- जून २०२५ : ‘पीएमआरडीए’च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ मंजूर
- जानेवारी २०२६ : माण डेपो आणि उन्नत मार्गावर मेट्रो गाड्यांच्या विविध तांत्रिक व सुरक्षा चाचण्या यशस्वी
- जुलै २०२६ : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून माण ते बालेवाडी (आर. के. लक्ष्मण संग्रहालय) दरम्यानच्या पहिल्या १२ स्थानकांना तात्पुरती सुरक्षा मंजुरी
- ऑक्टोबर २०२६ : उर्वरित मार्गावरील तांत्रिक तपासणी पूर्ण करून जिल्हा न्यायालय ते शिवाजीनगर जोडणाऱ्या आणखी पाच स्थानकांना सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले. यामुळे २३ पैकी १७ स्थानके प्रवाशांसाठी पूर्णपणे सज्ज
- ३ नोव्हेंबर २०२६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेट्रोतून प्रवास
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.