पुणे, ता. ५ : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी ‘पुणे मेट्रो लाइन ३’ला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बुधवारी ५० हजार प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला. सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने शहरातील बहुतांश कार्यालये आणि आयटी कंपन्या बंद असतानाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मेट्रोच्या या मार्गावर सध्या १७ स्थानके कार्यरत आहेत. यापैकी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाला प्रवाशांनी सर्वाधिक पसंती दिली. दिवसभरात तब्बल २५ हजार प्रवाशांनी या एकाच स्थानकावरून प्रवास केला. हे स्थानक पुणे रेल्वेस्थानक आणि शहराच्या इतर भागांना जोडणारे महत्त्वाचे ‘इंटरचेंज’ केंद्र असल्याने येथे प्रवाशांची मोठी गर्दी होती.
दर पाच मिनिटांनी मेट्रो
दिवाळीनंतर कार्यालये नियमित सुरू झाल्यावर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी, तर इतर वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध करून दिली जाणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा संपूर्ण प्रवास आता अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण होणार असल्याने आयटी कर्मचाऱ्यांचा खूप वेळ वाचणार आहे.
सायकल नेण्याची सुविधा
एकाच कार्डवर संपूर्ण पुणे मेट्रोमध्ये प्रवास करता येणाऱ्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ला (एनसीएमसी कार्ड) प्रवाशांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. यासोबतच पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी मेट्रोमधून सायकल नेण्याची सुविधाही दिली आहे. यामुळे प्रवाशांना स्थानकावरून घर किंवा कार्यालयापर्यंतचा प्रवास करणे सोयीचे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.