Pune Metro 
पुणे

Pune Metro: मोदींचा दौरा रद्द! पुण्यातील सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन आज नेहमीप्रमाणं राहणार सुरु

PM मोदींच्या हस्ते सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत रेल्वे मार्गाचं उद्घाटन आज होणार होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द झाला आहे. त्यामुळं पुण्यातील सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन आज पाच तास बंद राहणार होतं ते आता नेहमीप्रमाणं सुरु राहणार आहे. पुणे मेट्रो रेलकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

PM मोदींच्या हस्ते सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत रेल्वे मार्गाचं उद्घाटन आज होणार होतं. पण काल झालेल्या मुसळधार पावसामुळं तसंच आज दिलेल्या पावसाच्या रेड अलर्टमुळं नागरिक या कार्यक्रमाला येऊ शकले नसते. त्यामुळं हा कार्यक्रमच रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्याचबरोबर मेट्रोच्या उद्घाटनानंतर सप महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर जोरदार पावसामुळं खूपच चिखल झाल्यानं ते काहीही करुन दुरुस्त होणार नसल्यानं खरंतर पावसामुळं या कार्यक्रमावरच पाणी फेरलं गेलं आहे.

पुणे मेट्रो रेलनं काय दिलंय स्पष्टीकरण

पुण्यामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना उद्घाटन समारंभाला येणं शक्य होणार नाही. त्यामुळं तुर्तास जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक भूमिगत मार्गाचं उद्घाटन होणार नाही. त्यामुळं आज २६ सप्टेंबर २०२४ रोजी मेट्रो प्रवासी सेवेत जे बदल सुचविण्यात आले आहेत ते रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळं मेट्रो सेवा नियमितपणे सुरु राहील.

सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रोचं काय?

पण उद्घाटनच होऊ शकलं नसल्यानं जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक ही प्रवासी सेवा सध्या कार्यान्वित नसेल याची सर्व प्रवाशांनी व पुणेकरांनी नोंद घ्यावी! असंही पुणे मेट्रो रेलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Chh. Sambhajinager Crime: बहुत केस लढ रहा हैं तू; तू खतम, केस खतम, न्यायालयाबाहेर केला ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी १४ ऑक्टोबरला मोर्चा काढणार

SCROLL FOR NEXT