पुणे

Video : पुण्यात एकाच ट्रॅकवर दोन मेट्रो? व्हिडीओ व्हायरल, मेट्रो प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पुणे मेट्रो नेहमी या-ना त्या कारणाने चर्चेत असते. आता एकाच ट्रॅकवर चक्क दोन मेट्रो आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी नगर भागामध्ये ही घटना घडल्याचा दावा करण्यात येतोय. यासंदर्भात पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरणदेखील दिलंय.

व्हिडीओमध्ये दिसतंय की, ट्रॅकवर एक मेट्रो उभी असताना दुसरी मेट्रो समोर आली. निलेश निकम यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. वेगात आलेल्या मेट्रो चालकाने ब्रेक लावल्याने अनर्थ टळल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र पुणे मेट्रोने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये असं काहीही झालं नसल्याचं म्हटलं आहे.

पुणे मेट्रोचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोकडून तातडीने माहिती देण्यात आलेली आहे. मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे यांनी म्हटलं की, मेट्रोचा व्हिडीओ खालून घेतलेला आहे. त्यामुळे दोन्ही मेट्रो एकच मार्गावर आल्याचे भासत आहे. परंतु प्रत्यक्षात दोन्ही मेट्रो वेगळ्या मार्गावर आहे.

त्यांनी पुढे म्हटलंय की, हॉर्न वाजवणाऱ्या मेट्रोची चाचणी सुरू आहे. दोन्ही मेट्रो मुख्य मार्गावर नाहीत. त्या डेपोमध्ये ये-जा करण्याच्या मार्गावर आहेत. यामधील एक मेट्रो डेपोमध्ये जात आहे, तर दुसरी डेपोमधून मुख्य मार्गावर येत आहे. असं स्पष्टीकरण देण्यात आलंय.

मागच्याच आठवड्यात मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकामध्ये एकाच ट्रॅकवर दोन लोकल आलेल्या होत्या. आता पुन्हा पुण्यातल्या व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने पुण्याची मेट्रो चर्चेत असते. या व्हिडीओमुळे पुन्हा पुणे मेट्रो चर्चेत आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT