पुणे, ता. ३१ : दुचाकीसाठी आकर्षक आणि पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी पुणेकरांमध्ये क्रेझ असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नव्याने सुरू केलेल्या ‘एमएच ६१ बी’ या दुचाकींच्या मालिकेतील आकर्षक क्रमांकांसाठी वाहनधारकांचा प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील ‘५०१’ क्रमांकासाठी लिलावात ३० हजार रुपयांची बोली लागली आहे.
पुणे आरटीओ प्रशासनाकडून नुकतीच दुचाकींसाठी ‘एमएच ६१ बी’ ही नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे. यातील पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी ‘आरटीओ’कडे तब्बल ६५० अर्ज प्राप्त झाले होते. एकाच आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक वाहनधारकांनी अर्ज केल्याने नियमानुसार या क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. त्यात ‘५०१’ क्रमांकाला सर्वाधिक पसंती मिळाली असून, या क्रमांकासाठी ३० हजार रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे. तर, ‘२’ या एकअंकी आकर्षक क्रमांकासाठी २५ हजारांची बोली लागली आहे.
मालिका मंगळवारपासून खुली :
आकर्षक क्रमांकांची लिलाव प्रक्रिया आणि वाटप पूर्ण झाल्यानंतर, आता उर्वरित क्रमांकांसाठी ‘एमएच ६१ बी’ मालिका मंगळवारपासून वाहनधारकांसाठी खुली केली जाणार आहे. त्यामुळे नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्या वाहनधारकांना आता या मालिकेतील नियमित क्रमांक घेता येतील, अशी माहिती आरटीओ प्रशासनाने दिली आहे.
‘एमएच ६१ बी’ मालिकेतील पसंतीच्या क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. आता मंगळवारपासून नवीन मालिका वाहनधारकांसाठी खुली करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमित क्रमांकांसाठी रीतसर नोंदणी करावी.’’
- संदीप खडसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.