खंडोबा देवाची यात्रा
खंडोबा देवाची यात्रा  sakal
पुणे

Pune : धामणीच्या म्हाळसाकांत खंडोबा यात्रेची जय्यत तयारी

सुदाम बिडकर

पारगाव : धामणी ता.आंबेगाव येथील श्री. म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा माघ पौर्णिमेनिमित्त रविवार (दिः५) ते सोमवार (दिः६) रोजी होणार आहे. या दोन्ही दिवशी नवसाच्या बैलगाडा शर्यती , कुस्त्यांचा आखाडा, करमणुकीचेकार्यक्रमाबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात्रेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट व यात्रा उत्सव समितीने दिली आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, शिरूर, जुन्नर तसेच पारनेर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री म्हाळसाकांत खंडोबाची यात्रा दरवर्षी माघ पौर्णिमेला भरते. यात्रेनिमित रविवार दि.५ रोजी सकाळी ८ते ९ देवास हारतुरे, ११ ते ४ बैल व बगाडांच्या मिरवणुक व नवसाच्या बैलगाडा शर्यती, सायंकाळी ८ ते १० छबिना व पालखी सोहळा, रात्री १० वाजता हरीभाऊ बढे नगरकर सह ढोलकी सम्राट शिवकन्या बढे नगरकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवार दि. ६ सकाळी ८ ते दुपारी पर्यंत शाहीर रामदास गुंड आणि पार्टी (तुरेवाले) व शाहीर नाना साळुंखे आणि पार्टी (कलगीवाले) यांचा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ ते ६ कुस्त्यांचा आखाडा रात्री ९ वाजता मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. गेल्या वर्षी यात्रा झाली पण कोरोनामूळे यात्रेला गर्दी कमी होती.

यंदा मात्र यात्रा मोठ्या धूमधडाक्यात भरणार त्याची जय्यत तयारी धामणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती ग्रामस्थ व देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील लाखो भाविक मोठ्या संख्येने येऊन खंडोबा देवाचे दर्शन घेतात.या यात्रेचे खास वैशिष्टये म्हणजे येथील खंडोबाच्या नवसाची बगाडे आणि बैलगाडे पळवले जातात.यासाठी कोणत्याही प्रकारचे इनाम, बक्षिसे ठेवली जात नाही. भाविक भक्त आपल्या देवाच्या श्रध्देपोटी धामणी घाटात नवसाचे बैलगाडे आणून पळवितात.

नवसाचे गाडे पाहाण्यासाठी गाडाशौकिन आणि गाडा मालकांची मोठी गर्दी असते. यात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने खंडोबा मंदिर परिसरात हॉटेल, रसवंती गृहे, खेळण्याची दुकाने, शेतीउपयोगी अवजारे विक्रीची दुकाने उभारण्यास सूरुवात झाली आहे.

खंडोबा मंदिर परिसरात आकाश पाळणे, ब्रेकडान्स पाळणे, घोड्याचे पाळणे व इतर लहान पाळणे दाखल झाले आहेत. यात्रेतील जिलेबी,भजी, शेव रेवडी, ओली भेळ हे पदार्थ खवयांचे खास आकर्षण आहे. देवस्थानच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या व्यवसायिकांना, भाविक भक्ताना सर्व प्रकारचा सोई उपलब्ध करून दिल्या आहेत.असे देवस्थानच्या वतीने तसेच सरपंच रेश्मा बोऱ्हाडे,उपसरपंच संतोष करंजखेले व माजी सरपंच सागर जाधव यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT