PUNE NIGHT CURFEW 
पुणे

मिनी लॉकडाऊन; पुणेकरांना याची उत्तरे मिळणार का?

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शनिवारी रात्रीपासून पुढचे सात दिवस सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र यामध्ये लागू करण्यात आलेल्या काही निर्बंधाबाबत स्पष्टता नसल्यानं नागरिकांना काही प्रश्न पडले आहेत. याची उत्तरे कोण देणार असंही नागरिकांकडून विचारलं जात आहे. सध्या लॉकडाउन होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल्स आणि चित्रपटगृहे पुढील सात दिवसांसाठी म्हणजे शुक्रवारपर्यंत बंद राहतील. परंतु हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहील. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी हे आदेश लागू राहतील. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसगाड्या सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याचे तीव्र पडसाद उमटले. 

पुणेकरांना याची उत्तरे मिळणार का?

  • ओळखपत्र नसणाऱ्या मोलकरीण, स्वयंपाक करणाऱ्या महिला, केअर टेकर, असंघटीत कामगारांचे काय ?
  • घरेलू कामगारांना सायंकाळी सहा नंतर परवानगी मिळणार का?
  • अत्याश्‍यक सेवेसाठी रिक्षा, प्रवासी कार सुरू राहणार का ?
  • प्रवासी, रुग्णांचे नातेवाईक व अन्य महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांसाठी वाहतुक व्यवस्थेचे नियोजन आहे का ?
  • सायंकाळी सहानंतर बाहेर गावावरून आलेल्या किंवा बाहेरगावी जाण्यासाठी नागरीकांसाठी काही व्यवस्था असेल का? 

(हे प्रश्‍न प्रशासनाला ‘सकाळ’ने रात्री ८.३० च्या सुमारास विचारले होते. परंतु रात्री ११.५० मिनिटांपर्यंत त्याची उत्तरे मिळाली नव्हती.)

निर्बंध नेमके कसे असणार?

प्रश्‍न : निर्बंधांची अंमलबजावणी कधीपासून, कधीपर्यंत?
उत्तर : शनिवार (ता. ३) सायंकाळी ६ पासून शुक्रवार (ता. ९) पर्यंत.

प्रश्‍न : पीएमपीची सेवा कधीपासून बंद होणार?
उत्तर : शनिवारी (ता. ३) सकाळी सहा वाजल्यापासून पुढील सात दिवस.

प्रश्‍न : लॉज सुरू राहणार आहेत का?
उत्तर : चारबंदीच्या काळातही लॉज सुरू राहणार.

प्रश्‍न : रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीला बंदी आहे का?
उत्तर : रस्त्यावर खाद्यपदार्थ फक्त पार्सल स्वरूपात विकता येतील.

प्रश्‍न : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याला कसे ओळखणार?
उत्तर : ओळखपत्राद्वारे.

प्रश्‍न : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक कशी होणार?
उत्तर : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था असेल.

प्रश्‍न : सायंकाळी सहानंतर वैद्यकीय अथवा लसीकरणासाठी बाहेर पडता येणार का?
उत्तर : वैद्यकीय अथवा लसीकरणासाठी सायंकाळी सहानंतर जाता येणार.

प्रश्‍न : उद्योग-धंद्यांमध्ये शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना काय मुभा राहणार?
उत्तर : शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या वाहनांना परवानगी असणार आहे.

प्रश्‍न : हॉटेल कामगारांना सहानंतर पार्सल ऑर्डर देण्यासाठी जाता येणार का?
उत्तर : हो. रात्री अकरापर्यंत जाता येणार.

प्रश्‍न : खासगी डॉक्टरांना दवाखाने (ओपीडी) सुरू ठेवता येणार का?
उत्तर : त्यावश्यक सेवेत दवाखान्यांचा समावेश असेल तर, ते सुरू ठेवता येणार

प्रश्‍न : संचारबंदीत बाहेरगावी जाण्यासाठी प्रवास करता येणार का?
उत्तर : बाहेरगावी जाण्यासाठीचे सबळ कारण पुराव्यासह हवे.

प्रश्‍न : महामार्गावरील हॉटेल सुरू राहणार का?
उत्तर : संचारबंदीच्या नियमानुसार बंद राहणार.

प्रश्‍न : पास देण्यासाठी काय व्यवस्था असणार?
उत्तर : पास देण्याचे अद्याप नियोजन नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Swiggy food trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये ‘स्विगी’वर सर्वाधिक ऑर्डर केला ‘हा’ पदार्थ; तुम्ही खाल्लाय का?

Solapur News : विद्या मंदिर चे स्नेहसंमेलन म्हणजे ग्रामीण मुलांसाठीची पर्वणीच- तहसीलदार मदन जाधव.

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT