pune lockdown 
पुणे

पुण्यात मिनी लॉकडाऊन; पाहा कुठे काय घडलं?

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- पुण्यात कोरोनाचे कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मिनी लॉकडाऊनला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नांदेड, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला या परिसरात सायंकाळी सहा वाजल्यानंतर शुकशुकाट पाहायला मिळाला. मेडिकल, दवाखाने आणि दूध डेअरी वगळता इतर व्यावसायिकांनी दुकाने बंद केली होती. मुख्य सिंहगड रस्त्यावरुन तुरळक रहदारी सुरू होती. घोरपडी व बी टी कवडे रस्त्यावर मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आले. मागील लॉकडाऊन प्रमाणे विशेष पोलीस अधिकारी सक्रिय होण्याच्या सूचना मुंढवा पोलिसांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यास पोलिसांना सहकार्य केले. एकंदरीत पुणेकरांकडून कोरोना नियमांचे पालन होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात दरदिवशी 9 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. या पार्श्वभूमीवर पुण्यात 3 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याकाळात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमाdवबंदी असणार आहे. शिवाय संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबदी जाहीर करण्यात आली आहे. 

संध्याकाळी सहा वाजल्यापासून संचारबंदी असली तरी कामावरुन घरी जाणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी ठिकठिकाणी चौक्या उभ्या केल्या होत्या. बाहेर निघण्याचं कारण पोलिस विचारत होते. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. रविवारीही पोलिस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. मिनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT