Crime News esakal
पुणे

Pune : लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर

हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अटक करण्यात आलेला आरोपीही अल्पवयीन

निलेश बोरुडे

किरकटवाडी : पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मैत्रीचा बहाना करत करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारातून सदर मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या आईने सिंहगड रस्त्यावरील हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या घरासमोर गॅरेजमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन तरुणाने मुलीला मैत्रीच्या बहाण्याने फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दहावीत शिकणारी मुलगी या अल्पवयीन तरुणाने वारंवार केलेल्या लैंगिक अत्याचारातून चार महिन्यांची गर्भवती राहिली. मुलीच्या आईला संशय आल्याने तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने याबाबत आईला माहिती दिली. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला यामुळे धक्का बसला.

मुलीची प्रकृती खालावल्याने तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते यांनी रुग्णालयात जाऊन सदर मुलीच्या आईचा जबाब घेतला व त्यावरुन फिर्याद दाखल करुन घेण्यात आली आहे. तातडीने संबंधित अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

टॉपची कलाकार आणि कोट्यवधींची कमाई असूनही भाड्याच्या घरात राहते ही अभिनेत्री ; महिन्याचं भाडं वाचून बसेल धक्का !

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT