पुणे, ता. २८ : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध ठिकाणी आवश्यक असलेल्या ‘मिसिंग लिंक’च्या कामांचा आढावा घ्यावा. त्यामधील प्रलंबित भूसंपादन व अन्य अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील ‘मिसिंग लिंक’च्या अनुषंगाने बैठक झाली. महापालिका आयुक्त यांच्यासह अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे, शहर मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील विविध ‘मिसिंग लिंक’ची सद्यस्थिती, आवश्यक भूसंपादन, उपलब्ध जागा, संबंधित मालमत्ता, रस्ते जोडणीसाठी आवश्यक कार्यवाही तसेच प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विविध भागांतील रस्ते जोडणी अधिक सक्षम करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ची कामे महत्त्वाची आहेत. त्यामुळे संबंधित रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक भूसंपादन व प्रशासकीय कार्यवाहीला गती देऊन प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी केल्या. महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करून कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.