Neelam Gorhe sakal
पुणे

Neelam Gorhe : आमदारांवर झालेल्या हल्ल्यांबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश; डॉ. नीलम गोर्‍हे

दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत गृह विभागाला निवेदनाद्वारे निर्देश दिले.

समाधान काटे

पुणे : विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान (ता.७) फेब्रुवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यात त्यांच्या सभास्थानी दगडफेक झाल्याची आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना (ता.८) फेब्रुवारी रोजी घडली आहे.

या दोन्ही घटनांची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत त्यांनी माहीती घेतली आहे. त्याचसोबत या विषयावर दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत गृह विभागाला निवेदनाद्वारे निर्देश दिले.

या संदर्भात गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांना निवेदन दिले. असल्याची माहिती डॉ.गोर्‍हे यांनी गुरुवारी पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही घटनांमध्ये आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी योग्य त्या कलमंचा वापर करावा.

हे दोन्हीही हल्ले पूर्वनियोजित असल्याचे दिसत असल्याने यामागील खरे सूत्रधार कोण आहेत? याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरून पोलिस यंत्रणेला सूचित करावे.

प्रज्ञा सातव यांच्या हल्ल्याबाबत ज्यांनी कोणी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी. आवश्यक असेल तर भारतीय दंडसंहिता कलम १२० ब लावण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. आदित्य ठाकरे आणि प्रज्ञा सातव यांना पुरेशी सुरक्षा पोलिसांकडून देण्याबाबत आपल्या स्तरावरून तातडीने निर्णय घेण्यात यावा.

भविष्यात लोकप्रतिंनिधींना आशा अप्रिय घटनांना सामोरे जावे लागणार नाही यासाठी पोलिसांना अधिक सक्षमपणे संरक्षण देण्यासाठी आपल्या स्तरावरून विशेष मार्गदर्शन करण्यात यावे. गृह विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन अशा घटनांवर आळा बसण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित झाली असल्याचे सांगून याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात येतील अशी अपेक्षा त्यांनी लिमये यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना डॉ.गोर्‍हे व्यक्त केली आहे.

राज्यात घडलेल्या या दोन्हीही घटना अतिशय गंभीर आहेत. या दोन्ही घटनांचा आपल्या स्तरावरून सखोल तपास होण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे हल्ल्यांना सामोरे जावे लागणे हे नक्कीच बरोबर नाही. या पार्श्वभूमीवर निर्देश दिले आहेत

- डॉ. नीलम गोर्‍हे विधान परिषद उपसभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT