ravindra dhangekar sakal
पुणे

Pune News : आमदार रविंद्र धंगेकर यांच्याशी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साधला संवाद!

कोणी शिपाई, कोणी सुरक्षारक्षक, क्‍लर्कपासून ते थेट अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचीच शुक्रवारी सायंकाळी रविंद्र धंगेकर यांच्यासमवेत "सेल्फी', छायाचित्रे घेण्यासाठी अक्षरशः चढाओढ सुरु होती.

सकाळ वृत्तसेवा

कोणी शिपाई, कोणी सुरक्षारक्षक, क्‍लर्कपासून ते थेट अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचीच शुक्रवारी सायंकाळी रविंद्र धंगेकर यांच्यासमवेत "सेल्फी', छायाचित्रे घेण्यासाठी अक्षरशः चढाओढ सुरु होती.

पुणे - कोणी शिपाई, कोणी सुरक्षारक्षक, क्‍लर्कपासून ते थेट अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचीच शुक्रवारी सायंकाळी रविंद्र धंगेकर यांच्यासमवेत "सेल्फी', छायाचित्रे घेण्यासाठी अक्षरशः चढाओढ सुरु होती. 20-25 वर्ष नगरसेवक राहिलेले धंगेकर यांना "आमदार साहेब' म्हणून आवाज देत, त्यांच्याशी तितक्‍याच आपुलकीने संवाद साधत, जुन्या आठवणींना उजाळा देत महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर तितक्‍याच हक्काने एक-एक फोटो काढून त्यांच्यासमवेतच्या आठवणींना कॅमेऱ्यात कैद केले. याबरोबरच धंगेकर यांनी खासदार गिरीष बापट यांची आवर्जुन भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आपल्या कामाचा श्रीगणेशा केला.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये निवडुन आलेले महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांची पुण्यासह महाराष्ट्रभर जोरदार चर्चा झाली. मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी काहीसा निवांत वेळ मिळाल्यावर धंगेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या आवारात हजेरी लावली. धंगेकर यांना पाहून महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही तितकाच आनंद झळकला.

महापालिकेचे सुरक्षारक्षक, शिपाई, जमादार, क्‍लर्कपासून ते विविध विभागांचे विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही धंगेकर यांची आवर्जुन भेट घेत, हस्तांदोलन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. धंगेकर यांनीही त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करीत, त्यांच्या खांद्यावर हात टाकून आस्थेने विचारपुस केली. त्यांच्यासमवेत छायाचित्र काढतानाच जुन्या आठवणींना उजाळा देत ते काही क्षण हास्यविनोदातही रंगले. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीमध्ये पुष्पगुच्छ मागवित त्यांचा सन्मानही केला.

दरम्यान, धंगेकर यांनी खासदार गिरीष बापट यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली. बापट यांनीही धंगेकर यांना शुभेच्छा देत त्यांच्याशी काही प्रमाणात संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अंकुश काकडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT