Pune sakal
पुणे

Pune : जगातील सर्वात जुनी व सर्वात मोठी अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये मनसेचे सरचिटणीस रणजित शिरोळेंचा सहभाग

दर्बन ते पीटर्स मेरिटजबर्ग या दोन शहरा दरम्यान ८७० मीटर चढ असलेल्या मार्गावर ही स्पर्धा झाली.

समाधान काटे

Pune - 'कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा' (८७.७ किलो मीटर) हे अंतर १२ तासाच्या आत पूर्ण करायचे असते. पुणे येथील रणजीत शिरोळे यांनी हे अंतर ११ तास २८ मिनीटे आणि ३८ सेकंदातपार केले. ही मानाची स्पर्धा त्यांनी नुकतीच पूर्ण केली.

दक्षिण आफ्रिकेच्या जवानांच्या स्मरणार्थ भरवली जाणारी जगातील ही सर्वात जुनी व सर्वात मोठी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आहे. यावर्षी सुमारे २० हजार स्पर्धकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ४०३ भारतीय स्पर्धक त्यामध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस रणजित शिरोळे त्यातील एक स्पर्धक होते.

दर्बन ते पीटर्स मेरिटजबर्ग या दोन शहरा दरम्यान ८७० मीटर चढ असलेल्या मार्गावर ही स्पर्धा झाली. बारा तासांच्या आत ती पूर्ण करायची असते. या स्पर्धेदरम्यान सहा कट ऑफ दिलेले आहेत. कट ऑफ टाइमिंग नंतर एखाद्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यास स्पर्धकाला पुढे जाण्याची परवानगी नसते. शिरोळे यांनी ठरलेल्या वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली.

कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. अतुल गोडबोले यांचे प्रशिक्षण त्यांना लाभले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT