mns Pune Esakal
पुणे

Death threats: पुण्यातील मनसे नेत्याच्या 16 वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी

शिवीगाळ करत जिवे मारण्याची दिली धमकी

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष असलेल्या साईनाथ बाबर यांच्या 16 वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आरती साईनाथ बाबर यांच्या म्हणण्यानुसार बाबरचा मुलगा सोसायटीतील इतर मुलांसोबत खेळत असताना धमकी दिली आहे. या प्रकरणी साईनाथ बाबर यांच्या पत्नी आरती बाबर यांनी कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे.

आरोपी महिलेचं नाव हवा पिर खान असं आहे. तिने साईनाथ बाबर यांच्या मुलाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. साईनाथ बाबर हे कायम चर्चेत राहिले आहे. कोरोना काळात त्यांनी शहवासीयांसाठी मोठे काम केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकनिष्ठ तसेच एक कट्टर मनसैनिक म्हणून त्यांची पुण्यात ओळख आहे. या लहान मुलाला धमकी देण्यात आल्यामुळे संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे.

साईनाथ बाबर यांचा १६ वर्षाचा मुलगा सोसायटीत खेळत आसताना या महिलेने त्या ठिकाणी येऊन त्याला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी साईनाथ बाबर यांच्या पत्नी आरती बाबर यांनी कोंढवा पोलिसात तक्रार दिली आहे.

दरम्यान याआधी पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या मुलाच्या नावाने बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून त्याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले होते. आता मनसेच्या आणखी एका नेत्याच्या मुलास धमकी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT