In Pune MNS protest against the increase in electricity bill and aggressive activists detained 
पुणे

पुण्यात वीजबील वाढी विरोधात मनसेचा मोर्चा रोखला; आक्रमक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात वाढीव वीजबिलाविरोधात काढलेला मनसेचा मोर्चा पुण्यात पोलिसांनी रोखला असून कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फरासखाना पोलिस ठाण्यासमोर कार्यकत्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. 

'...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​

वाढीव वीजबिलाविरोधान राज्यात मनसेने एल्गार पुकारला आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला आहे.  वाढीव वीजबिल विरोधात आज पुण्यात मनसेचा महामोर्चा निघणार होता. दरम्यान या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यांनतर आक्रमक झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला  असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. त्यांनतर पुणे पोलिसांनी शेकडो मनसैनिकांना ताब्यात घेतली फरासखाना पोलिस ठाण्यात आणले आहे.  

Corona Updates: ३५ दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा रुग्णांचा आकडा हजारापार!​

मनसेची मोठया प्रमाणात घोषणाबाजी सुरू पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. मनसेमोर्चामध्ये सरकारला शॉक देण्यासाठी काही युवकांनी अंगाला वायर गुंडाळाल्या आहेत. फरासखाना पोलिस ठाण्यात मनसेने धरणे आंदोलन सुरू केलंय. जिल्हाधिकारी यांनाच ''इथं बोलवा नाहीतर, आम्हाला ताब्यात घेऊ नका.


भाजपचे उपमहापौर सहभागी 
केंद्र सरकार भाजपचे आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. कामगार व शेतकरी कायद्याबाबत कामगारांनी केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन पुकारले होते. मात्र, त्यास पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे उपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरले. त्यांची भूमिका केंद्र सरकारच्या अर्थात भाजपविरोधी आहे का? अशी चर्चाही उपस्थितांमध्ये रंगली. याबाबत 'सकाळ'शी बोलताना घोळवे म्हणाले, "मी कामगार आहे. कामगार कायद्यांबाबत भारतीय मजदूर संघापासून सगळेच जण एकत्र आहोत. चांगले कामगार कायदे व्हावेत, यासाठी मी आलो होतो, मार्गदर्शन केले. कृती समितीच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींना घेऊन लवकरच दिल्लीत केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यास त्यांचीही भेट घेणार आहे. जेणेकरून कामगार व उद्योजक दोघेही जगले पाहिजे, हा माझा उद्देश आहे. शहराचा उपमहापौर, कष्टकरी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी उपस्थित होतो.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar industry: साखर कोणी खाईना, खपात घसरण; मार्चचा ५० टक्के कोटा पडून; एप्रिलमध्येही विक्रीचे ‘चॅलेंज’, उद्योगासमोर दुहेरी संकट!

Vidarbha News:शासकीय कार्यालये की मृत्यूचे सापळे? ; ९५ टक्के इमारती धोकादायक; कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

Vidarbha News: रस्त्यांची दयनीय स्थिती; विकासकामांसाठी प्रतीक्षाच; हलबीटोला मार्गासह मुख्य रस्ते जीर्ण; अपघाताचा धोका वाढला

Amravati News: सेंट्रल बँकेत तीन कोटींचा अपहार; न केलेल्या कामाचे देयके काढून पैसा खिशात

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT