JP-Nadda
JP-Nadda 
पुणे

जम्मू-काश्‍मीरमध्ये "पुणे मॉडेल' राबवू - नड्डा 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे-श्रीनगर "सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा "पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज दिले. 

भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा यांनी "कलम 370 रद्द केल्यानंतरची स्थिती' या विषयावर पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद साधला. भाजपचे राष्ट्रीय सचिव व्ही. सतीश, खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, राष्ट्रीय एकता अभियानाचे राज्य समन्वयक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते. 

सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नड्डा यांनी पुणे-श्रीनगर सिस्टर सिटी प्रस्तावाबाबत तसेच शैक्षणिक संस्थांच्या "पुणे मॉडेल' संदर्भात केंद्र सरकार योग्य ती दखल तातडीने घेईल, असे सांगितले. हा प्रस्ताव चांगला असून, त्याची सविस्तर माहिती द्या, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना नड्डा यांनी "समान नागरी कायदा' हा विषयही आमच्या पूर्णपणे लक्षात आहे, असे सूचक विधान केले. 

काश्‍मीरमधील सध्याची परिस्थिती सामान्य कधी होणार? यावर बोलताना नड्डा म्हणाले की, यापूर्वीही अनेकदा जम्मू-काश्‍मीरमध्ये यापेक्षाही जादा काळ संचारबंदी राहिलेली आहे. काश्‍मीरमधील परिस्थिती आता सुधारत असून, लवकरच जनजीवन सामान्य होईल. आताही परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये आता दहशतवादाचा खात्मा होण्यास अनुकूल वातावरण तयार होईल. या ठिकाणी गुंतवणूक वाढेल, शैक्षणिक सुविधा वाढतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT