Crime esakal
पुणे

Pune Ransom : पैशांसाठी तगादा लावणाऱ्या सावकाराविरुध्द खंडणीचा गुन्हा

दोन लाख रुपयांच्या बदल्यात दोन लाख ४० हजार रूपये परत करूनही एक लाख ८० हजार रूपयांची अवाजवी मागणी करून धमकी देणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दोन लाख रुपयांच्या बदल्यात दोन लाख ४० हजार रूपये परत करूनही एक लाख ८० हजार रूपयांची अवाजवी मागणी करून धमकी देणाऱ्याविरुध्द खंडणी विरोधी पथक-२ ने खंडणी आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सूरज शशिकांत म्हेत्रे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील एका व्यक्तीने सूरज म्हेत्रे याच्याकडून २०२१ मध्ये दोन लाख रूपये दरमहा दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याच्या बदल्यात आरोपीने मुद्दल आणि व्याज असे एकूण दोन लाख ४० हजार रूपये रोख आणि ऑनलाइन स्वरूपात परत केले होते.

परंतु पैसे परत करूनही सूरज म्हेत्रे याने फिर्यादीला मोबाईलवरून शिवीगाळ केली. तसेच, धनादेश न वटल्यास मारहाण करण्याची धमकी दिली होती. याबाबत फिर्यादीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला. या अर्जाची चौकशी करून खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT