पुणे

पुणे शहरासह जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

CD

पुणे, ता. २२ : शहरात रविवारी पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सोमवारी विश्रांती घेतली. मात्र, सोमवारी (ता. २२) मॉन्सून अधिकृतरीत्या पुण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस शहरासह जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. याशिवाय, जिल्ह्याला पुढील चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून कमालीचा उकाडा जाणवत होता. मात्र, मॉन्सूनच्या आगमनामुळे शहर आणि परिसराच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सोमवारी कमाल आणि किमान तापमानात एकाच दिवशी तीन अंश सेल्सिअसची घट झाली. रविवारी ३६ अंश सेल्सिअस असलेले कमाल तापमान सोमवारी ३३ अंशांवर आले; तर किमान तापमान २३.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सोमवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण असल्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
पुणे आणि परिसरात मंगळवारी (ता. २३) कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३३, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बुधवारपासून (ता. २४) कमाल तापमानात किंचित घट होऊन ३२, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT