पुणे

सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

CD

पुणे, ता. ५ : दुचाकींना फटाका सायलेन्सर बसवून मध्यरात्री कर्णकर्कश आवाज करत धानोरी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे पावणेसहा लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

धानोरीतील रिगालिया सोसायटी परिसरात ३१ जुलैला पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान काही तरुण दुचाकींचे सायलेन्सर बदलून फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करत भरधाव वाहने चालवत असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रारी नोंदविल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली.

तपासपथक आणि बीट मार्शल यांनी संबंधित तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आशिष अशोक शिंदे (वय २१, रा. निंबाळकरनगर, लोहगाव), गुरुपीतसिंग कर्नलसिंग कंबोज (वय २१, रा. निंबाळकरनगर, लोहगाव), संजय मुकेश सरवदे (वय २०, रा. भीमनगर, विश्रांतवाडी), गौरव लक्ष्मण मस्के (वय २०, रा. मस्केवस्ती, विश्रांतवाडी) तसेच एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायलेन्सर नष्ट करण्याचा इशारा
काळेपडळ पोलिसांनीही नुकतीच अशा प्रकारची कारवाई केली. शहरात फटाका सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. बेकायदा सायलेन्सर आढळल्यास ते जप्त करून नष्ट करण्यात येतील. संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT