Road sakal
पुणे

Pune : अपूर्णावस्थेतील बाह्यवळण मार्गावर वाहनचालकांची कसरत

हांडेवाडी-खडीमशीन चौक - विद्युत खांब, वीज वाहिन्या, केबल्सचा अडथळा

अशोक बालगुडे

उंड्री : कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गाचे अपूर्णावस्थेमध्ये काँक्रिटीकरण केल्याने वाहतूककोंडी दिवसेंदिवस जटील बनत आहे. हांडेवाडीतील डोंगर आणि विद्युत खांब, पिसोळीतील पद्मावती मंदिराशेजारील अरुंद रस्ता, जागेवर वळण, आंबेकर चौकातील अरुंद रस्ता, धर्मावत पेट्रोल पंप चौक, या ठिकाणी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे,

सार्वजनिक बांधकाम आणि पालिकेच्या रस्ता विभागाने बाह्यवळण मार्गातील अडथळे हटवून रुंदीकरण करावे, असा सबुरीचा सल्ला वाहनचालक आणि कामगारांनी प्रशासनाला दिला आहे.

हांडेवाडी चौक- खडी मशीन चौक दरम्यान विद्युत खांब न हटविल्यामुळे रस्तारुंदीकरण रखडले आहे. अनेक ठिकाणी तीव्र उतार आणि एकदम वळण असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यातील चेंबर वर-खाली असून, पथदिवे नाहीत, त्यामुळे आणखी किती अपघात झाल्यानंतर या रस्त्यातील अडथळे हटवून रस्तारुंदीकरण केले जाईल, असा उपरोधिक सवाल शेतकरी आणि रात्री-अपरात्री ये-जा करणाऱ्या दत्तात्रय होळकर, वसंत झांबरे, लक्ष्मण झांबरे, महेंद्र शेवाळे यांनी उपस्थित केला आहे.

अवजड वाहने पुणे शहरात न येता बाह्यवळण मार्गाने जावीत यासाठी या रस्त्याचे नियोजन केले. मात्र, मागिल अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकही कमालीचे त्रासले आहेत. या बाह्यवळण मार्गावरून मुंबईहून सोलापूर, पंढरपूर, सातारा, बारामतीकडे जाणारी आणि येणारी वाहने धावतात. तीव्र उतार आणि जागेवर वळण असल्याने रात्रीच्या वेळी समोरच्या वाहनाच्या प्रखर विद्युत दिव्यांचा प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची धोका वाढला आहे.

दिवसा गावांच्या ठिकाणी असलेल्या चौकात रिक्षा, दुचाकी, कार अशी छोटी वाहने अचानक आडवी येतात, त्यामुळे अवजड वाहनांवर नियंत्रण मिळविताना चालकाला कसरत करावी लागते. छोट्या वाहनांना धक्का लागला तरी स्थानिक मंडळी अवजड वाहनचालकाला मारहाण करतात. त्यामुळे बाह्यवळण मार्गाने वाहने चालवावित की नाही, अशी विचारणा अवजड वाहनचालक सचिन कदम, स्कूल बसचालक शंकर मिसेकर, सुनील गायकवाड, राम उमाप यांनी केली.

मंतरवाडी चौक, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी दरम्यान विद्युत खांब आणि वीजवाहिन्या आहेत. त्यावर केबल लोंबकळत असून, अनेक केबल रात्रीच्या वेळी दुचाकीचालकाचा गळा घोटतील की काय अशा स्थितील लोंबकळत आहेत. हांडेवाडी चौक-उंड्री चौक दरम्यान दोन ठिकाणी डोंगराच्या बाजूला एकच वाहन जाईल असा रस्ता बनविला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी वारंवार वाहने धडकून अपघात होत आहेत. विद्युत खांब हटवून भूमिगत वीजवाहिनी करावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणकडे वारंवार पत्रव्यवहार केल्याचे राजेंद्र भिंताडे, विशाल कामठे, सचिन हांडे, माऊली हांडे, दत्ता होळकर यांनी सांगितले.

-धनंजय हांडे, कामगार, हांडेवाडी

विद्युत खांबाचा अडथळा, जुन्या झाडांचे बुंधे, धोकदायक विद्युत तारांमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बाह्यवळण मार्ग केला. मात्र, या रस्त्यावर वाहतूक सुरळीत होण्याऐवजी रात्रीच्या वेळी अपघात होण्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी आणि सायकल चालवायलाच नको, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

-राजेंद्र कुंभारकर, उंड्री

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता जान्हवी रोडे म्हणाल्या की, बाह्यवळण मार्गाच्या कामासाठी अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळाली आहे. लवकरच महावितरणकडे पैसे वर्ग केले जातील, त्यानंतर विद्युत खांब आणि वीजवाहिन्यांचे काम होईल. त्यानंतर बाह्यवळण मार्गाचे काम लवकरच मार्गी लावले जाईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT