पुणे

पेशवेकालीन पंजांची डावी उजवी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - "बारा इमाम के दो चारो दिन'..."या अली'.."या इलाह इल्‌लाह'..."हजरत इमाम हुसेन के दो चारो दिन'..च्या जयघोषात पेशवेकालीन बारा इमाम दर्ग्याच्या व हजरत सय्यद शाह बाबा दर्ग्याच्या पेशवेकालीन पंजांच्या डावी-उजवीच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत दोन्ही पंजांची डावी-उजवी झाल्यावर पाच प्रदक्षिणाही घालण्यात आल्या. 

शुक्रवार पेठेतील बारा इमाम दर्गा आणि घोरपडे पेठेतील हजरत सय्यद शाह दर्ग्याचा डावी-उजवीचा कार्यक्रम दरवर्षी मोहरममध्ये असतो. मिरवणूक मार्गावर पंजाला फुलांचा सेहरा वाहण्यात येत होता. नागरिकांमार्फत मिरवणुकीतील भाविकांना सरबतवाटप करण्यात येत होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नावंदे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के यांच्या हस्ते दोन्ही पंजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

बारा इमाम दर्ग्याचे फारुक अहमद इस्माईल सिद्दिकी म्हणाले, ""मोहरममध्ये दोन्ही दर्ग्यांच्या पंजांची डावी-उजवी होते. ही धार्मिक प्रथा व परंपरा आहे. मिरवणुकीत वाघाची निशाणी (झुल्फिकार) असते. भाविक श्रद्धेने वाघाच्या रंगांच्या पट्ट्यांनी त्यांच्या मुलांना सजवितात.'' तर हजरत सय्यद शाह दर्ग्याचे मुजावर सलिम अब्दूल अझीझ बोजगर म्हणाले, ""पंजांना मेथीच्या भाजीचा नैवेद्य असतो. डावी-उजवीचा कार्यक्रम झाल्यावर बाबांच्या दर्ग्यावर सर्वधर्मीय नागरिकांसाठी "खिचडा'चा (कडधान्यांचा पदार्थ) भंडारा (नियाजे हुसेन) असतो. डावी-उजवीच्या वेळेस बारा इमाम के दो चारो दिन यासह "हजरत इमाम हुसेन, हजरत मौला अली, हजरत बिबी फातिमा, हजरत सय्यद शाह बाबा के दोन चारो दिन' असा जयघोष आवर्जून करतो.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ विरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी करणार नेतृत्व

London Wari: सातासमुद्रापार पोहोचली विठ्ठलभक्ती! लंडनहून निघाली पंढरीची वारी; प्रथमच लंडन ते पंढरपूर ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’

Nagpur: महागाई, गुन्हेगारीविरोधात ‘रास्ता रोको’; विदर्भवाद्यांचा एल्गार; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट, १७ ताब्यात

Suryakumar Yadav: श्रेयसकडे कॅप्टन्सी जाताच सूर्यकुमार यादवचं रौद्ररूप; फक्त ३६ चेंडूंत उडवला धुरळा, वाचा नेमकं काय घडलं"

SCROLL FOR NEXT