भातशेती sakal
पुणे

पुणे : मुळशीकरांना पुन्हा भातशेतीची गोडी

लागवडीच्या क्षेत्रात ६६३ हेक्टरने वाढ; उसाच्या पिकात घट

धोंडिबा कुंभार

पिरंगुट : कमी उत्पन्नामुळे ऊस लागवड क्षेत्रात घट, कोरोनामुळे शेतीचे उमगलेले महत्त्व आणि पावसाने दिलेली साथ, आदी कारणांमुळे मुळशी तालुक्यात भात पिकाच्या लागवड क्षेत्रात यावर्षी तब्बल ६६३ हेक्टरने वाढ झाली आहे.

तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुळशीत खरीप क्षेत्र सरासरी १२ हजार ४०० हेक्टर असून, त्यात भात, ऊस, कडधान्ये व अन्य पिकांची लागवड केली जाते. या वर्षी उसाऐवजी भात पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. एकट्या मुठा खोऱ्यातील खारावडे गावात यावर्षी सुमारे आठ ते नऊ एकर ऊस क्षेत्र कमी झालेले असून पाच ते सहा एकर क्षेत्रात भात लागवड वाढली आहे. खारावडे येथील शेतकरी अंकुश मारणे, शंकरराव मारणे, रामभाऊ साळेकर, रामभाऊ ढेबे, विठ्ठल मारणे, लक्ष्मण मारणे व अन्य शेतकऱ्यांनी ऊस क्षेत्र कमी करून भात लागवडीला पसंती दिली आहे. वातुंडे, कोळावडे, आंदगाव, माळेगाव व अन्य गावांतही हीच परिस्थिती आहे.

याबाबत आंदगाव येथील शेतकरी अंकुश मारणे म्हणाले, ‘‘ऊस पिकाची वेळेत तोडणी न झाल्याने उत्पन्नात घट होऊ लागली आहे. पाऊस सुरू झाल्यावर ऊस तोडणी सुरू झाली; तर वाहतुकीची समस्या उभी राहते. उशिरा ऊस तोडल्यामुळे उत्पन्न तर घटतेच, पण त्यानंतर त्या जमिनीतील खोडवा पिकात गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे खोडवा पिकाला नेमके कोंब फुटायच्या काळातच पाणी साचल्याने वाढीवर मोठा परिणाम होतो. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असून पाण्याच्या निचऱ्याअभावी उत्पादनही कमी होते. त्यामुळे मी यावर्षीपासून उसाचे सर्व क्षेत्र काढून टाकले असून, त्या क्षेत्रात भात पीक घेतले आहे.’’

‘‘मुठा खोऱ्यात आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ऊस पिकावर तुडतुडे, पांढरी माशी व अन्य कीड असते. ऊस पिकालगतच्या बांधावरच आंब्याची लागवड झालेली असते. त्यामुळे उसावरील कीड आंब्यावर येते आणि त्याचा फटका आंबा पिकाला बसतो. कृषी विभागाने त्यावर पर्याय शोधला पाहिजे,’’ असे शेतकरी अंकुश मारणे यांनी सांगितले.

भातशेतीची आकडेवारी...(हेक्टरमध्ये)

७८५० : सरासरी क्षेत्र

८२६५ : या वर्षीची लागवड

७६०२ : गेल्या वर्षीची लागवड

६६३ : तुलनेने वाढलेले क्षेत्र

ऊस पिकाला या भागात एकरी सरासरी केवळ पस्तीस टन उत्पादन सापडते. शिवाय जमीन अडकून पडते. तिची मशागत होणे थांबते. त्याउलट भात पीक घेतल्यास त्या जमिनीत लगेचच गहू, हरभरा, ज्वारी, वाटाणा अथवा कोथिंबीर आदी उत्पादन घेता येते. त्यामुळे दुबार पिकामुळे मशागतही चांगली झाल्याने मातीचा पोत टिकून राहतो. त्यामुळे ऊस पीक घ्यायचे बंद करून त्या जमिनीत भाताची लागवड केली आहे.

- प्रशांत मारणे, शेतकरी, खारावडे (ता. मुळशी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT