RTO crime sakal
पुणे

Pune Mumbai Expressway : लेन कटिंग करणाऱ्या ३९११ वाहनांवर कारवाई

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लेन कटिंगची मोठी समस्या आहे. तीन महिन्यांत परिवहन विभागाने ३९११ वाहनांवर कारवाई केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लेन कटिंगची मोठी समस्या आहे. तीन महिन्यांत परिवहन विभागाने ३९११ वाहनांवर कारवाई केली आहे.

पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लेन कटिंगची मोठी समस्या आहे. तीन महिन्यांत परिवहन विभागाने ३९११ वाहनांवर कारवाई केली आहे. वाहनांच्या प्रकारानुसार लेनची निश्चिती केली असली तरीही अनेक वाहनधारक ‘ओव्हरटेक’च्या लेनमध्येच बराच वेळ वाहन चालवितात. परिणामी ‘ओव्हरटेक’ची लेन व्यस्त होत आहे. दुसरीकडे चालकांना लक्षात यावे याकरिता लेनमधील रस्त्यांवर पांढऱ्या रंगात ट्रक, चारचाकी असे लिहिले आहे.

सोमवार ते शुक्रवार दरम्यान पुणे- मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर रोज सरासरी ६५ ते ७० हजार वाहने धावतात. शनिवारी, रविवारी व सुट्टीच्या दिवशी ही संख्या १० हजाराने वाढते. मुंबईहून पुण्याला येताना अनेक वाहन चालक हे दुपारी तीन ते चारची वेळ निवडतात. घाटात ते पाचच्या सुमारास दाखल होतात. त्यामुळे रात्री नऊपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होते. यात कंटेनरची संख्या देखील आहे. तेव्हा मोटारचालकांनी पाच ते नऊची वेळ सोडून प्रवास करावा जेणेकरून कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

घाटात संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. प्रवाशांनी दुपारी तीन-चार वाजता प्रवासाला सुरवात करण्यापेक्षा या वेळेच्या आधी प्रवास सुरू करावा. जेणेकरून कोंडी टाळता येईल.

- भरत कळसकर, परिवहन उपायुक्त, मुंबई

नेमके काय होत आहे?

  • परिवहन विभाग मागील तीन महिन्यांपासून सातत्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत आहे.

  • यात अतिवेगाने वाहन चालविणे, लेन कटिंग करणाऱ्या वाहनाची संख्या अधिक आहे.

  • द्रुतगतीवर डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी तीन लेन

  • डाव्या बाजूला जड वाहनासाठी, मधल्या लेनमध्ये चारचाकी आणि उजव्या बाजूची लेन ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांना राखीव आहे.

  • ओव्हरटेक करून संबंधित वाहन आपल्या निर्धारित लेनमध्ये जाणे अपेक्षित आहे.

  • मात्र काही वाहन चालक ‘ओव्हरटेक’च्या लेनमध्येच वाहने दामटत आहेत. अशांवर कारवाई सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT