पुणे

अटल सेतू पुण्याच्या रिंगरोडशी जोडणार

CD

पुणे, ता. १५ ः पुणे आणि मुंबईदरम्यानचा रस्ते प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे (पॅकेज) भूमिपूजन येत्या तीन महिन्यांच्या आत होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या नवीन मार्गामुळे मुंबई-पुणेदरम्यानचा प्रवास दीड तासांनी कमी होणार असून, यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या गडकरी यांनी आज ही माहिती दिली.
मुंबईतील ‘अटल सेतू’ येथून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर जेएनपीटीच्या दिशेने वळल्यास या नवीन द्रुतगती मार्गाची सुरुवात होणार आहे. हा मार्ग थेट पुण्याच्या प्रस्तावित रिंगरोडला जोडला जाईल. त्यामुळे मुंबईहून येणारी वाहतूक थेट पुण्याच्या बाह्यवळण मार्गावर येईल आणि तिथून पुढे फलटण येथून थेट बंगळूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. या नवीन प्रकल्पामुळे पुणे, मुंबई आणि बंगळूर या तिन्ही महत्त्वाच्या शहरांमधील रस्ते वाहतूक गतिमान होणार आहे.

पुणे ते नागपूर साडेचार तासांत
पुणे आणि नागपूरदरम्यानचे अंतर केवळ साडेचार ते पाच तासांत कापता येणे आता शक्य होणार आहे. यासाठीच्या नवीन ‘ग्रीन हायवे’ प्रकल्पाचे काम राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले आहे. या नव्या मार्गाची आखणी (अलाइनमेंट) निश्चित झाली आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे सुमारे १८० ते २२० किलोमीटरचे अंतर या नवीन ‘ग्रीन हायवे’मुळे अवघ्या २ तासांत पार करता येईल. पुढे हा मार्ग जालन्याजवळ ‘समृद्धी महामार्गाला’ जोडला जाईल. तिथून पुढील अडीच तासांत नागपूर गाठता येईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

भविष्यातील इंधन ग्रीन हायड्रोजन
भविष्यातील ऊर्जेची गरज ओळखून भारताला ऊर्जानिर्मितीत अग्रेसर करण्यासाठी ‘ग्रीन हायड्रोजन’वर मोठा भर दिला जात आहे. कचरा आणि बायो-डायजेस्टच्या माध्यमातून मिथेन व सीओटू वेगळा करून सीएनजी तसेच हायड्रोजन तयार केला जात आहे. कोळशापासून ‘ब्लॅक’, पेट्रोलियमापासून ‘ब्राऊन’ आणि पाणी व कचऱ्यापासून ‘ग्रीन हायड्रोजन’ तयार होतो. सध्या पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्यासाठी प्रतिकिलो ५० युनिट वीज लागते (सोलर वीज वापरल्यास १५0 रुपये खर्च येतो). हा खर्च भविष्यात १ डॉलर (सुमारे ८५ रुपये) प्रतिकिलोवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. देशात सध्या १० प्रमुख मार्गांवर हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रक्स आणि बसचा पायलट प्रोजेक्ट सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT