पुणे

पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने वाचणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होऊ शकेल, अशा खालापूर- कुसगाव बोगदा तयार करण्याच्या राज्य रस्तेविकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावाला राज्य सरकारने आज (ता. ३०) मंजुरी दिली. सुमारे १३ किलोमीटरच्या या बोगद्याचे काम पावसाळ्याच्या अखेरीस सुरू होणार आहे.   

पायाभूत सुविधांच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. याचवेळी वर्सोवा- बांद्रा सी-लिंक आणि ठाणे खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या उभारणीच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाला खोपोलीपासून, तर पुण्याकडून सोमाटणे फाटा येथून सुरवात होते. बोगदा तयार झाल्यावर वाहनचालकांना खंडाळा घाटाचा वापर करण्याची गरज राहणार नाही. जुन्या पुणे- मुंबई महामार्गाचा सुमारे दहा किलोमीटरचा भाग द्रुतगती मार्गात सध्या समाविष्ट आहे, त्यामुळे तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. या प्रकल्पामुळे जुना महामार्ग द्रुतगती मार्गापासून वेगळा होणार आहे. या प्रकल्पांतर्गतच तीन किलोमीटरचा ‘केबल पूल’ उभारण्यात येणार आहे. दरम्यान, वाशीच्या खाडीवर होणाऱ्या सहापदरी पुलामुळे मुंबईत प्रवेश करतानाची कोंडी टळणार आहे. हा पूल ‘एल अँड टी’ कंपनी उभारणार असून, त्यासाठी सुमारे ५६० कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलामुळे सायन- पनवेल मार्गावरील कोंडीही दूर होणार आहे. 

उपसमितीने मंजुरी दिल्यामुळे या प्रकल्पाचे काम आता कमी दरात निविदा भरणाऱ्या कंत्राटदाराकडे सोपविता येईल. पावसाळ्याच्या अखेरीस काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या निधीसाठी ‘एमएसआरडीसी’ स्पेशल पर्पज व्हेइकल उभारणार आहे.
- राधेश्‍याम मोपलवार, कार्यकारी संचालक, एमएसआरडीसी

प्रकल्पाची किंमत  - ४,९९४ कोटी
बोगद्याचे अंतर   - १३ किलोमीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Maharashtra Monsoon Prediction : नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेले संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप भारतात परतले

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

SCROLL FOR NEXT