पुणे

समर्थ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे खो-खो स्पर्धेत यश

CD

बेल्हे, ता. ३ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ शैक्षणिक संकुलात समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (आयपीए), आळेफाटा लोकल ब्रांच यांच्या वतीने, नुकतेच पुणे-मुंबई राज्यस्तरीय मुलांच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या खोखो स्पर्धेचे विजेतेपद समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीने मिळवले.
बेल्हे येथे समर्थ शैक्षणिक संकुलात आयोजित या खो-खो स्पर्धेमध्ये आयपीए आळेफाटा स्थानिक शाखा अंतर्गत, विविध महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते.

समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. स्पर्धेचे विजेतेपद समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे व उपविजेतेपद समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांना मिळाले. तसेच मुलींच्या खो-खो स्पर्धा जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, कुरण येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्येही समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी यांनी विजेतेपद, तर समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांनी उपविजेतेपद पटकाविल्याचे सांगण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून ओंकार ढवळे व ओंकार सोलट यांनी काम पाहिले. क्रीडा समन्वयक डॉ. मंगेश होले, क्रिडा संचालक हरिश्‍चंद्र नरसुडे, क्रीडा शिक्षक प्रा. सुरेश काकडे, आयपीए समन्वयक अजय भागवत, विभागप्रमुख प्रा. नितीन महाले, प्रा. प्रतीक भांड, डॉ. बिपिन गांधी यांनी आयोजनाची जबाबदारी पार पडली. संस्थेच्या वतीने विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Road Accident : परदेशात फिरण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात नोकरी करणाऱ्या बीडच्या पूजाचा थायलंडमध्ये मृत्यू; दुचाकीवरून फिरताना अपघात

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून मोठ्या रांगा

स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

SCROLL FOR NEXT