coaching class 
पुणे

पुण्यात कोचिंग क्‍लासेसला परवानगी मिळणार का? आयुक्तांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्पर्धा परीक्षा, व्यवस्थापनशास्त्र, (एमबीए), अभियांत्रिकीसह काही अभ्यासक्रमांचे क्‍लासेस (खासगी शिकवणी वर्ग) सुरू होण्याची शक्‍यता आहे. अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढच्या वर्षी होणार असल्याने क्‍लासेसला परवानगी देण्याचा आग्रह विद्यार्थी, पालक, शिकवणी चालकांनी धरल्याने; त्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुढच्या आठवड्यात म्हणजे, एक सप्टेंबरनंतर क्‍लासेस सुरू होण्याची आशा आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेऊनच क्‍लासेसबाबत निर्णय होईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले. 

दरम्यान, सध्याच्या स्थितीत एक सप्टेंबरपासून नवे काही बदल करण्याबाबत येत्या शुक्रवारी महापालिकेत बैठक होणार असून, त्यामध्ये बंद असलेले व्यवहार, विशेषत: क्‍लासेस आणि खासगी आस्थापनांना आणखी काही सवलती दिल्या जाण्याची शक्‍यता आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा-महाविद्यालयांसह खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत. सध्या बहुतांशी व्यव्हार सुरू झाले तरीही, शैक्षक्षिक संस्था सुरू झालेल्या नाहीत. त्यातच परीक्षा न घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, पुढच्या वर्षी परीक्षा होणार असल्याने किमान खासगी शिकवण्यांचे वर्ग सुरू व्हावे, अशी अपेक्षा विद्यार्थी-पालकांची आहे. ही मागणी लावून धरत क्‍लासेस सुरू करण्यासाठी मालकांनीही आग्रह धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर क्‍लासेसला परवानगी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

कोरोनाचा संसर्ग, सद्य:स्थिती, आरोग्य यंत्रणा आणि वाढत्या संसर्ग याचा दर महिन्याला दोनदा आढावा घेण्यात येतो. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून व्यवहारांबाबतची बंधने-सवलती ठरविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून येत्या एक सप्टेंबरपासून नव्याने काय सुरू करायचे, यासाठी महापालिका आयुक्त आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर क्‍लासेस आणि अन्य व्यवहारांबाबतचे नवे निर्णय जाहीर होतील. 

बाजारपेठांबाबतचे बहुतांशी अटी-शर्ती शिथिल केल्यानंतर हॉटेलही सुरू होण्याची आशा होती. त्यामुळे एक सप्टेंबरपासूनच्या नव्या नियमात हॉटेल सुरू करण्याची सवलत मिळेल का, याची उत्सुकता आहे. परंतु, गणेशोत्सव संपेपर्यंत हॉटेलला परवानगी मिळण्याची शक्‍यता नाही, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यावरही या आठवड्याच्या आढावा बैठकीत चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan News: सिलिंडरच्या टंचाईवर बायोगॅसची मात; पाचलगावच्या महिलेचा उपक्रम; कृषी विभागाच्या मदतीने उभारले संयंत्र

Nagpur News: युद्धाच्या झळांनी ग्रामीण भाग होरपळतोय; डिझेलअभावी शेतीकामात अडथळा: पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात करणार हजर

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Washim News: महामार्गांवरील वृक्षतोडीला थांबवा; शहरातील नागरिकांची न्यायालयात धाव; शंभर वर्ष जुन्या वृक्षावार घाला

SCROLL FOR NEXT