नळ आहे, पण पाणी नाही ! sakal
पुणे

पुणे : ताडीवाला रोड परिसरात नळ आहे, पण पाणी नाही !

खड्डा झोपडपट्टी परिसरात गेल्या दोन वर्षापासून नविन नळाची लाईन टाकली. तेव्हापासून साठ घरांना पाणीच येत नाही.

कैलास गावडे

मुंढवा : ताडीवाला रोड श्री चिंतामणी गणेश मंदिराच्या पुढे खड्डा झोपडपट्टी परिसरात गेल्या दोन वर्षापासून नविन नळाची लाईन टाकली. तेव्हापासून साठ घरांना पाणीच येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची तारांबळ उडत आहे. पालिकेने नागरिकांना दहा दिवसात अखंडित आणि सुरळीत पाणीपुरवठा करावा अन्यथा बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्रावर महिलांसह हंडा मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा सुनिल भोईटे यांनी दिला आहे.

ताडीवाला रोड परिसरातील खड्डा झोपडपट्टी भागात सुरळीत पाणीपुरवठा होत असला, तरी काही घरांना पाण्याचा ठणठणाट आहे. काही ठिकाणी नळातून फक्त हवा येते. पाणी आले तरी ते थेंब थेंब, अशी अवस्था आहे. या भागांमध्ये दिवसभर नळाखाली लावून ठेवलेली बादली देखील भरत नाही. लोकप्रतिनिधींकडे पाणी पुरवण्याची मागणी केली, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील महिलांनी सांगितले.

रहिवाश्यांच्या प्रतिक्रीया

छत्रभूज कांबळे - आमच्या भागातील निम्या नागरिकांच्या नळाला पाणीच येत नाही. त्यामुळे आमच्या घरातील महिलांना रात्री-अपरात्री जागून दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे.

शयनाज नाकेवाटळ - सगळीकडे नियमित पाणी येते परंतु आमच्या नळांना थेंब थेंब तर काही नळांना पाणीच येत नाही. त्यामुळे पिण्यापुरतेही हंडाभर पाणी मिळत नाही. पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागते.

सुनिता राजवरके - नळाला पाणी येत नसल्यामुळे पिण्यापुरतेही हंडाभर पाणी मिळत नाही. पिण्याचे व वापरण्याचे पाणी दुसरीकडून आणण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे कामाला धावतपळत जावे लागते. आम्ही पालिकेची घरपट्टी वेळोवेळी भरतो, परंतु पालिका अम्हाला पिण्यापुरते पाणी का पुरवू शकत नाही ?

यास्मिन इनामदार - सकाळी उठल्यापासून कुटूंबातील प्रत्येक जणाची पाण्यासाठी वणवण सुरू होते. वारंवार पाण्यासाठी बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्राला पाण्यासाठी तक्रार केली. लवकरच समस्याचे समाधान होईल असे सांगितले जाते. मात्र दोन वर्षात आजपर्यंत सुरळीत पाणीपुरवठ्याची समस्या सुटली नाही. महापालिकेने या भागातील पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढावा. बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुरेश सखाले यांचेशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Raigad Women : 'लाडकी बहीण' योजनेतून तब्बल 50 हजार महिलांची नावं वगळली; 'ही' आहेत महत्त्वाची कारणं, यादीत तुमचं तर नाव नाही ना?

Jalgoan News: २५ वर्षीय विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू, पिंपळनेरमध्ये नातेवाईकांचे आंदोलन, डॉक्टरांवर गंभीर आरोप

Gold Rate Today : सोन्याने घेतली उसळी तर चांदी घसरली ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Iran US Conflict: पश्चिम आशियातील तेल निर्यात रोखू; नाकेबंदीनंतर इराणचा इशारा, अमेरिकेच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT