Money
Money esakal
पुणे

पुणे : पाणी पुरवठा विभागाने वसूल केले १०० कोटी

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शासकीय तसेच खासगी कार्यालये, सोसायट्या यांना पाणी तोडण्याचा इशारा देऊन गेल्या वर्षभरात १०२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली.

पुणे - पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) शासकीय तसेच खासगी कार्यालये, सोसायट्या यांना पाणी तोडण्याचा इशारा देऊन गेल्या वर्षभरात १०२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल (Arrears Recovery) केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा २५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाली आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे शहरातील निवासी, बिगरनिवासी, औद्योगीक मिळकतींना पाणी पुरवठा केला जातो. ज्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाण्याची गरज भासते तेथे मिटर लावून महापालिका पाणीपट्टी घेते. तसेच शहरातील पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट, रेल्वे यासह इतर केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालयांनाही पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेचे काही ठिकाणी मिटर खराब झाल्याने नेमकी किती पाणीपट्टी भरायची यावरून संबंधित संस्था आणि महापालिकेत वाद आहेत. त्यामुळे ही थकबाकी वसूल न झाल्याने ही रक्कम वाढत जाऊन सुमारे ६०० कोटी इतकी झाली आहे.

मोठ्या रकमेची थकबाकी वसूल करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने विभागनिहाय यादी केली आहे. त्यानुसार संबंधित थकबाकीदारांकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यास प्रतिसाद न दिल्यास पाणी बंद करण्याचा इशारा दिला जातो. गेल्यावर्षभरात ससून १.२५ कोची, रेल्वे ४८ लाख, ॲम्युनेशन फॅक्टरी ३५ लाख. त्याचप्रमाणे दोन्ही कॅन्टोन्मेंट यांनीही लाखो रुपयांची थकबाकी भरली आहे.

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, गेल्यावर्षी ८ मार्च पर्यंत ७५ कोटीची थकबाकी वसूल झाली होती. यंदा आजच्या तारखेला १०२.६२ कोटीची थकबाकी वसूल केली आहे. शासकीय कार्यालये, कंपन्यांकडून पाणीपट्टी वसुलीसाठी भर दिला जत आहे. ३१ मार्च पर्यंत हा आकडा आणखी वाढेल.’’

शैक्षणिक संस्थाही रडारवर

शहरातील शैक्षणिक संस्थांकडूनही पाणीपट्टी भरलेली नाही. यामध्ये काही शासकीय संस्था, विद्यापीठ, खासगी विद्यापीठ, महाविद्यालये यांचा समावेश आहे. त्यांना नोटीस दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT