Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Pune Municipal Budget : पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ७ मार्च रोजी होणार सादर

पुणे शहरासाठी २०२४-२५ या वर्षाचा महापालिकेचा अर्थसंकल्प ७ मार्च रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार हे स्थायी समितीला सादर करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहरासाठी २०२४-२५ या वर्षाचा महापालिकेचा अर्थसंकल्प ७ मार्च रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार हे स्थायी समितीला सादर करणार आहेत. गेल्या वर्षी ९५९२ कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला होता. यंदा महापालिकेचा अर्थसंकल्प दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार आयुक्तांनी १५ जानेवारी पर्यंत स्थायी समिती समोर अर्थसंकल्प मांडणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासक असल्याने अर्थसंकल्प बाबत स्थायी समिती आणि मुख्य सभेत कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे या ठरावाला बगल देत मार्च महिन्यातच अर्थसंकल्प मांडण्यावर आयुक्तांनी भर दिलेला आहे.

सलग तिसऱ्या वर्षातही ते मार्च महिन्यातच अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागणार असताना त्याच्या काही दिवस आधी म्हणजे ७ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीचा सादर केलेला आहे.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, समतल विगलक, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प या प्रकल्पांसह पुणेकरांसाठी कोणत्या योजना आयुक्त आणणार आहेत? त्यासाठी किती निधी असणार आहे? याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT