पुणे

मुख्य खात्यांच्या निधी वाटपाला चाप

CD

पुणे, ता. १४ : महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालयांसाठी आर्थिक तरतूद केली जाते. तरीही, मुख्य खात्याकडून क्षेत्रीय कार्यालयांमधील विकास कामांसाठी परस्पर निधी उपलब्ध करून दिला जातो. या प्रकाराची महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी गांभीर्याने दखल घेत मुख्य खात्यांनी निधी परस्पर क्षेत्रीय कार्यालयांना देऊ नये, असे स्पष्ट आदेश प्रशासनास दिले आहेत.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मधील कासेवाडी-डायसप्लॉट परिसरातील विकासकामांसाठी आयुक्तांनी अंदाजपत्रकात साडेपाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. हा निधी प्रभाग क्रमांक २३ ड मध्ये वळविण्याचा ठराव स्थायी समितीत मंजूर झाला आहे. या निर्णयाला भाजपच्या नगरसेवकांपाठोपाठ कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही विरोध केला होता. संबंधित नगरसेवकांना विश्वासात न घेता निधी वळविल्याचा आरोप करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. त्याचबरोबर बंडगार्डन परिसरातील दोन विकासकामांसाठी राखीव असलेली साडेपाच कोटी रुपयांची तरतूद तळजाई परिसरातील रस्त्यांसाठी वळविण्यात आल्याचा मुद्दाही चर्चेत आहे. या गंभीर प्रकारावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला होता.

या स्वरूपाची प्रकरणे पुढे आल्यानंतर आयुक्तांनी थेट परिपत्रक काढले आहे. आयुक्तांनी आर्थिक नियोजनात सुसूत्रता आणण्यासाठी कडक भूमिका घेत संबंधित प्रकाराला चाप लावण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत.

अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांना सूचना
क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारीतील कामांसाठी मुख्य खात्यांकडील अर्थसंकल्पीय निधी उपलब्ध करून दिला जात आहे. संबंधित प्रकार आर्थिक नियोजनाच्यादृष्टीने योग्य नाही. त्यामुळे मुख्य खात्यांनी यापुढे स्वतःकडील अर्थसंकल्पीय तरतूद क्षेत्रीय कार्यालयांकडील कामांकरीता परस्पर उपलब्ध करून देऊ नये, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांसह सर्व खातेप्रमुखांना यासंदर्भात अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

SCROLL FOR NEXT