पुणे

पुण्यात पालिका आयुक्तांचा बदल्यांचा दणका

सकाळवृत्तसेवा

पुणे -  महापालिका आयुक्त सौरव राव यांनी महापालिकेच्या अनेक  विभागप्रमुखांच्या शुक्रवारी सायंकाळी बदल्या केल्या. सुरेश जगताप, ज्ञानेश्वर मोळक, उल्का कळसकर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. 

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. शुक्रवारी कार्यमुक्त होऊन लगेचच दुसऱ्या ठिकाणचा कार्यभार घेण्यास त्यांना बदलीच्या आदेशातच बजावण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे जगताप यांना आता उपायुक्त परीमंडळ क्रमांक ४ हे पद देण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर सहायक आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोळक यांच्याकडे स्थानिक संस्था कर व परिमंडळ क्रमांक ४ चा कार्यभार होता. स्थानिक संस्था कर कायम ठेवून परिमंडळ क्रमांक ४ हून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तुषार दौंडकर यांच्याकडील आकाश चिन्ह विभागाचा अतिरिक्त कार्यभार विजय दहिभाते यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्याकडे परिमंडळ क्रमांक १ चा उपायुक्त म्हणून कार्यभार आहे. तो सांभाळून त्यांनी या पदाचा कार्यभार पहायचा आहे. त्यांच्याकडे पुर्वीही हा विभाग होता.

दौंडकर यांच्याकडेच क्रिडा विभागाचाही अतिरिक्त कार्यभार होता. तो उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनीही आपल्या मुळ पदाचा कार्यभार सांभाळून हा नवा कार्यभार पहायचा आहे.  स्थापत्य विभागातील अधिक्षक अभियंता मदन आढारी यांच्याकडील प्रकल्प क्रमांक २ चा कार्यभार बदलून त्यांना मलनिसारण विभागाची देखभाल दुरस्ती सोपवण्यात आली आहे. या पदावर कार्यरत असलेले हेमंत देवधर यांना पाणी पुरवठा विभागात बदलण्यात आले आहे. पाणी पुरवठा विभागातील जगदीश खानोरे यांना तिथून बदलून प्रकल्प क्रमांक २ ची जबाबदारी देण्यात आली आहे. 

राव यांनी आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच विभागप्रमुखांसह कनिष्ठ अभियंत्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सर्वांना नव्या पदावर त्वरीत रूजू होण्याचा आदेश देण्यात आला असून राजकीय दबाव किंवा अन्य मार्गाने बदली टाळण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबीही देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT