khadakwasla dam  Sakal
पुणे

Pune Water : पुणे महापालिकेने मागितले २०.९० टीएमसी पाणी

पुणे शहराला खडकवासला धरण प्रकल्प, भामा आसखेड धरण, रावेत बंधारा या ठिकाणावरून पाणी पुरवठा केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहराची वाढणारी लोकसंख्या, कामानिमित्त पुण्यात येणारे नागरिक या सर्वांचा विचार करता सुमारे ७२ लाख लोकसंख्येला पुढील वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून २०.९० टीएमसी पाणी साठा उपलब्ध व्हावा अशी मागणी पुणे महापालिका करणार आहे. हे पाण्याचे अंदाजपत्रक जुलै अखेरपर्यंत जलसंपदा विभागाला सादर केले जाणार आहे.

पुणे शहराला खडकवासला धरण प्रकल्प, भामा आसखेड धरण, रावेत बंधारा या ठिकाणावरून पाणी पुरवठा केला जातो. पण शहराचा बहुतांश भाग हा खडकवासला धरण प्रकल्पावर अवलंबून आहे. महापालिकेचा पाटबंधारे विभागासोबत झालेल्या करारानुसार १२.४१ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाते.

पण शहराची वाढती लोकसंख्या, समाविष्ट झालेली ३४ गावे यामुळे पाण्याची मागणी दरवर्षी वाढत आहे. राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिकेला दरवर्षी पाटबंधारे विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून ते सादर करावे लागते.

यामध्ये गेल्यावर्षीच्या लोकसंख्येत सरासरी दोन टक्के वाढ गृहीत धरली जाते. तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांची दोन टक्के वाढलेली लोकसंख्या, पुणे शहरात नोकरी, शिक्षक, व्यवसायासाठी रोज ये जा करणारे नागरिक यांना गृहीत धरून पुढील वर्षभरात किमान ७२ लाख लोकसंख्येला पाणी द्यावे लागणार आहे. तसेच पाणी गळती ३५ टक्के ग्राह्य धरून महापालिकेने २०.९० टीएमसी पाण्याची मागमी केली आहे. गेल्यावर्षी २०२२-२३ यावर्षासाठी २०.३४ टीएमसी पाण्याची मागणी केली होती.

मात्र जलसंपदा विभागाने त्यांच्या हिशोबानुसार पुणे शहरासाठी १२.४१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केले होता. पाणी पुरवठा विभागाने २०.९० टीएमसी पाण्याची मागणी करणारे अंदाजपत्रक आयुक्त विक्रम कुमार यांच्या मान्यतेसाठी सादर केले आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर जुलै महिना संपण्यापूर्वी जलसंपदा विभागाला सादर केले जाईल.

‘२०२३-२४ या वर्षासाठी महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले असून, २०.९० टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली जाणार आहे. हे अंदाजपत्रक जुलै अखेरपर्यंत त्यांच्याकडे सादर केले जाईल.’

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT