Plastic Bottle Sakal
पुणे

Plastic Bottle : तीन हजार किलो प्लास्टिक बाटल्या जमा

पुणे महापालिकेने प्लास्टिकचा कचरा निर्मूलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेने प्लास्टिकचा कचरा निर्मूलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

पुणे - महापालिकेने प्लास्टिकचा कचरा निर्मूलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तीन हजार २४८ किलो प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या आहेत. यात घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय आघाडीवर आहे. दरम्यान, स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महापालिकेने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढविली आहे.

शहरातील प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनास चालना मिळावी व नागरीकांना प्लास्टिक कचरा संकलनाची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी एक फेब्रुवारी रोजी ‘प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धे’ची घोषणा केली होती. कमिन्स इंडिया या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्‍ट्रिक बाइक अशा स्वरूपाची बक्षिसेही अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी जाहीर केले होते. ही स्पर्धा २८ फेब्रुवारीपर्यंत होती, मात्र नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महापालिका प्रशासनाने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढविली आहे.

प्लास्टिकच्या कचऱ्याबाबत जनजागृती होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानुसार, प्लास्टिक बाटल्या संकलन स्पर्धेसाठी नागरिकांनीही चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ३ हजार २४८ किलो प्लास्टिक बाटल्यांचे संकलन झाले आहे.

- आशा राऊत, घनकचरा विभाग प्रमुख, महापालिका

प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर

महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या रिसायक्‍लर्स किंवा प्रोसेसर्सकडे संकलित झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून आकर्षक म्युरल्स, पेव्हर ब्लॉक्‍स, इंटरलॉकिंग ब्लॉक्‍स इ. साहित्य बनवून त्याचा वापर शहर सौंदर्यीकरण किंवा उद्याने, रस्ते, फुटपाथच्या सुशोभीकरणासाठी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT