Pune Municipal Corporation 5 crore proposal for redevelopment of Sarasbaug Chowpatty pune sakal
पुणे

Sarasbaug Chowpatty : सारसबाग चौपाटीच्या पुनर्विकासासाठी साडे पाच कोटींचा प्रस्ताव

महापालिकेतर्फे सारसबाग चौपाटी येथे वॉकिंग प्लाझा विकसित करण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेतर्फे सारसबाग चौपाटी येथे वॉकिंग प्लाझा विकसित करण्यात येणार आहे. तेथील खाद्यपदार्थांच्या व्यावसायिकांनी अटीशर्तींवर स्टॉल लावून व्यवसायास परवानगी देण्यात येणार आहे. याचा आराखडा महापालिकेने तयार करण्यात आले असून, याकामासाठी सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. महापालिकेने सारसबाग चौपाटीवर अतिक्रमण कारवाई करून वाढीव क्षेत्र वापरल्याने ५२ स्टॉल सील केले होते. तेथील शेड, टेबल, खुर्च्या जप्त केल्या. व्यावसायिकांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होत नसल्याने महापालिकेने ही कारवाई केली होती. अनेक दिवस स्टॉल बंद असल्याने व्यावसायिकांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती.

यावर आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत सारसबाग चौपाटी येथे अतिक्रमण होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये यादृष्टीने उपाय योजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौपाटीचे सुशोभीकरण, स्टॉलची एक सारखी पण आकर्षक अशी रचना, नागरिकांना चालण्यासह बसण्यासाठी खास जागा असा वॉकिंग प्लाझाचे नियोजन करण्यात आले. वॉकिंग प्लाझा' झाल्यानंतर चौपाटी परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पेशवे उद्यानाजवळ असलेल्या वाहनतळापर्यंतच आपली वाहने नेता येणार आहे. व्यावसायिकांना खुर्च्या आणि समोरील बाजूस छत लावण्यासाठी ठराविक जागा निश्चित करून दिली जाणार आहे. त्यामुळे सारसबागेत येणाऱ्यांना आता या रस्त्यावर मोकळेपणाने वावरता येणार आहे. या आराखड्याचे नुकतेच प्रेझेंटेशन झाले. काही बदल सुचवण्यात आले असून या आराखड्याबाबत सोमवारी बैठक घेऊन त्यास अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT