Agitation sakal
पुणे

Pune News : महापालिकेसमोरील आंदोलनात कार्यकर्त्याला मारहाण

क्रांती दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्ते, खड्डे, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था, वाहतूक कोंडी यासह इतर प्रश्‍नांवर आंदोलनाचे आयोजन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिका भवनासमोर क्रांती दिनाच्या निमित्ताने नागरी समस्यांवर आंदोलन सुरू असताना सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केल्याने संयोजक कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार आज (ता. ९) घडला.

सामाजिक कार्यकर्ते रूपेश केसेकर आणि अमित सिंग यांनी क्रांती दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्ते, खड्डे, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था, वाहतूक कोंडी यासह इतर प्रश्‍नांवर आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या समोर आंदोलनात सहभागी झाले.

राजकीय पदाधिकारी यामध्ये सहभागी झाल्याने स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींवर त्यावर आक्षेप घेतला. हे पदाधिकारी श्रेय घेण्यासाठी आले आहेत. आज जी स्थिती आहे, त्यास ते देखील जबाबदार आहेत, अशी टीका करण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष शिंदे यांनी यावर आक्षेप घेत आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेले आहोत.

आमच्याशी चर्चा करा अशी हरकत घेतली. त्यानंतरही भाषण सुरु असल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माईक हिसकाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी केसेकर आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, त्यास केसेकर यांना मुक्कामार लागला आहे.

केसेकर म्हणाले, शहरातील समस्यांवर नागरिकांच्यावतीने आम्ही हे आंदोलन सुरू होते. त्यामध्ये राजकीय पक्षांना बोलविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांना निघून जावे असे सांगितल्याने मला काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार केलेली नाही.

शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘संयोजकांनी निमंत्रण दिल्याने आम्ही आंदोलनात सहभागी झालो. यावेळी आमच्याकडे पक्षाचे झेंडे नव्हते. पण आमच्यावरच टीका सुरू केल्याने त्यावर आक्षेप घेतला. काही कार्यकर्त्यांनी माईक काढून घेताना किरकोळ धक्काबुक्की झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT