Pune Municipal Corporation appeals for registration of citizens returning from abroad 
पुणे

परदेशातून मायदेशी परतलेल्या नागरिकांना नावनोंदनी करण्यासाठी पुणे मनपा चे आवाहन

सकाळवृत्तसेवा

पुणे -  राज्यातील शहरांभोवती दिवसेंदिवस कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. दररोज नवनवीन शहरांत आणि ग्रामीण भागांतही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन एक मार्च व त्यानंतर परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन प्रशासनास माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. नाव नोंदणी करणे अत्यावश्यक असून, idsp.mkcl.org या लिंकवर जाऊन त्वरीत माहिती द्यावी असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना हा विषाणू परदेशातून भारतात पसरला आहे. चीन, इटली, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरू असतानाच, भारतातही आता सुरुवात झाली आहे. योग्य उपचार करून काही जण बरे देखील होत आहेत. देशात सर्वाधिक  रुग्ण केरळ आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. 

लॉक डाऊनची कठोर अंमलबजावणी करा; पंतप्रधान मोदींची सूचना 

हा आजार संसर्गातून होत असल्यामुळे रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचा मागोवा, नंतर त्यांची तपासणी आणि उपचार म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीप्रमाणे काम करत आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगर पालिकेकडून 1 मार्चनंतर परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परदेशातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचा संपूर्ण माग काढता किंवा शोध घेणे शक्य आहेच, परंतु मनुष्यबळाअभावी यंत्रणेस त्यात वेळ लागू शकतो. मात्र त्या सर्वांचा मागोवा घेण्यात येणारच आहे, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी केंद्र, राज्य सरकार, महापालिका, पोलिस व जिल्हा प्रशासन संयुक्तपणे काम करत आहे.

दरम्यान, "प्रशासनाने माग काढून आपल्या घरापर्यंत येण्याची वाट न पाहता, परदेशातून परतलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन वरील लिंकवर प्राधान्याने माहिती द्यावी. आपल्या प्रियजनांच्या, संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे," असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Talegaon Station News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्तेकामाचा अंतिम अध्यादेश जारी; डीबीओटी तत्वावर होणार काम

SCROLL FOR NEXT