pune municipal corporation campaign collection of waste household items from saturday sakal
पुणे

Pune News : घरातील खराब वस्तू संकलनासाठी शनिवारपासून महापालिकेची मोहीम

मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, वॉशिंग मशिन यासह इतर खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळा करण्यासाठी ५ नोव्हेंबरपासून मोहीम सुरु

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दसऱ्याच्या पूर्वी घरोघरी स्वच्छतेचे काम करताना खराब झालेल्या,अडगळीत पडलेल्या वस्तू, कपडे, फर्निचर यासह इतर साहित्य कचऱ्यात टाकले जाते. अनेकदा नागरिक हे साहित्य रस्ते, मोकळ्या जागांमध्ये फेकून देतात. हे प्रकार बंद व्हावेत यासाठी महापालिकेने १४ आॅक्टोबरपासून कचरा संकलनासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक प्रभागात दोन आरोग्य कोठींवर वस्तू संकलन केंद्र सुरु केले जाणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली आहे.

दसरा, दिवाळीपूर्वी नागरिक फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाद्या, उश्‍या, कपडे, पडदे यासह इतर वस्तू खरेदी करतात. त्याच वेळी जुन्या वस्तू भंगारात दिल्या किंवा कचऱ्यात टाकल्या जातात. या वस्तूंचा पुनर्वापर शक्य असल्याने महापालिकेतर्फे गेल्या वर्षीपासून जुन्या वस्तूंच्या संकलनासाठी दसरा दिवाळीपूर्वी मोहीम राबविली जात आहे. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. यंदा १४ ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरु होत आहे. प्रत्येक प्रभागातील किमान दोन आरोग्य कोठ्यांमध्ये सकाळी दहा ते चार या वेळेत या वस्तू स्वीकारल्या जातील.

इ-कचऱ्यासाठी ५ नोव्हेंबरपासून मोहीम

मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, वॉशिंग मशिन यासह इतर खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळा करण्यासाठी ५ नोव्हेंबरपासून मोहीम सुरु केली जाणार आहे. यामध्ये महापालिका, जनवाणी, कमिन्स इंडिया, पूर्णम इकोव्हीजन, सागर मित्र, थंब क्रिएटिव्ह, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह यासह शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. ३०० ठिकाणी ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलन अभियान राबविले जाईल. याची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.

देवाचे फोटो, मूर्तीसाठीही मोहीम

घरातील खराब झालेले किंवा तुटलेले, फुटलेले देवी देवतांचे फोटो, मुर्ती नदीपात्र, तलाव, झाडांच्या बुंध्यांशी ठेवले जात आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी महापालिकेने देवी देवतांसंबधित सर्व वस्तू व साहित्य गोळा करण्यासाठी २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम आयोजित केली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने निश्‍चित केलेल्या जागेवर सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT