Sinhgad Road Potholes Sakal
पुणे

Pune Potholes : पावणे सतरा हजार खड्डे बुजविल्याचा पुणे महापालिकेचा दावा

यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची स्थिती चांगली असेल असे महापालिकेकडून सांगितले जात होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील सर्वच भागातील रस्‍त्यांना खड्डे पडून वाहनचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली असताना महापालिकेच्या पथ विभागाने १ जून ते २६ जुलै या कालावधीत शहरातील १६ हजार ७४७ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. तर आज दिवसभरात ३९ खड्डे बुजविण्यात आलेले आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची स्थिती चांगली असेल असे महापालिकेकडून सांगितले जात होते. त्यासाठी ३०० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. पण केवळ ४८ किलोमीटर रस्त्यांचे काम झाले आहे.

पथ विभागाने देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर प्रत्येकी दोन कोटी रुपयांची निविदा खड्डे बुजविण्यासाठी काढली आहे. त्यातून खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होता. पण अद्याप खड्डे बुजलेले नाहीत. उलट पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या वाढली आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सात दिवसात शहरातील सर्व खड्डे बुजवा असे आदेश दिले होते. त्यानुसार पथ विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामाला गती आणली आहे. पण अजूनही अनेक भागात खड्डे आहेत.

पथ विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार १ जून ते २६ जुलै ५६ दिवसात शहरात तब्बल १७ हजार १९३ खड्डे आढळून आले होते. त्यापैकी १६ हजार ७४७ खड्डे बुजविण्यात आले आहेत. ४४४ खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक आहे. प्रशासनाने ९० टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला असला तरी प्रत्येक रस्त्यावर खड्डे दिसून येत आहेत.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ‘‘एक जूनपासून १६ हजार ७४७ खड्डे महापालिकेने बुजविले आहेत. शहरात अजूनही खड्डे आहेत, ते कामही लवकरच पूर्ण केले जाईल. नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

भर पावसात डांबरीकरण

खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पण धायरी येथील स्मशानभूमीच्या समोरील रस्त्यावर मुसळधार पाऊस सुरू असताना ठेकेदाराने डांबर टाकून त्यावर रोडरोलर फिरवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रस्ता वाहून गेल्याने पेव्हिंग ब्लॉक

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने माणिकबाग भागात एका महिन्यापूर्वी डांबरीकरण करून खड्डे बुजविण्यात आले होते. पण हा रस्ता पावसात वाहून गेला, अनेक खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे मंगळवारी रात्री वाहतूक बंद करून या ठिकाणी प्रशासनाने पेव्हिंग ब्लॉक बसवून रस्ता दुरुस्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT